शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

रायफलमधून सुटली चुकून गोळी

By admin | Updated: October 12, 2016 00:36 IST

सप्तशृंगगड : आठ जखमी; भाविकांत घबराट

वणी/सप्तशृंगगड : नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर विजयादशमीला यज्ञकुंडातील होमामध्ये बोकडाचे मुख अर्पण करण्याची परंपरा असून, प्रकोप शांत करण्यासाठी बोकडाचे मुख अर्पण करण्याचे आयोजन विजयादशमीला गडावरील पंचविसाव्या पायरीजवळ आखण्यात आले होते. प्रथेनुसार तयारी सुरू असताना सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने रायफलचा ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून आठ जण जखमी झाले. त्यात मंदिर प्रशासन व न्यासाचे चार कर्मचारी व चार ग्रामस्थ आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गडावर ही घटना घडली. मनोज वाघ कुटुंबीयांकडे हा मान आहे. दत्तमंदिराजवळील उंबराच्या झाडाजवळ व परिसरात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मुख अर्पण करण्यासाठी बोकड गडावर आणताना गर्दी नियंत्रण मिळवित असताना सैन्य दलातील सेवानिवृत्त व न्यासाच्या सुरक्षारक्षक पथकात कार्यान्वित श्रावण चव्हाण (४८) हे विधिपूर्ततेची प्रतीक्षा करत रायफलने सलामी देण्याच्या तयारीत असताना जमिनीलगत तोंड असलेल्या रायफलच्या ट्रिगरवरील बोट दाबला गेल्याने रायफलीमधील गोळी सुटली. ही सुटालेली गोळी जमिनीवरील फरशीवर आदळली. या गोळीचे तुकडे झाले तसेच गोळी जोरात आदळल्याने फरशीही फुटली.यातील तुकडे उडून सागर दुबे (२८, रा. नांदूर), रामचंद्र पवार (२५), सुरक्षारक्षक शरद सिसोदे (२८), सुरक्षा कर्मचारी गणेश देशमुख, कर्मचारी पद्माकर देशमुख (३०), संतोष पवार, मधुकर गवळी यांना ते लागल्याने जखमी झाले. सागर दुबे यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांच्यासह जखमींना नाशिकच्यां जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोकडबळीनंतर रायफलने हवेत फैरी झाडून सलामी देण्याची परंपरा आहे. याचे नियोजन व नियंत्रण यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकारघडला.संबंधित सुरक्षा रक्षकावर गुन्हादाखल कर ण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)