शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी बळीराजा हवालदिल

By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST

पावसाअभावी बळीराजा हवालदिल

 

घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात तीन महत्त्वाची नक्षत्रे उलटूनही पावसाने आगमन न केल्याने लागवडीसाठी पेरणी केलेली भाताची रोपे जळण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. कधी एकदा पाऊस बरसेल आणि कधी भाताची लागवड होईल या विचाराने तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पाऊस लांबणीवर पडल्याने तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत असणाऱ्या विहिरी, नद्या-नाले आटल्याने कोरडेठाक पडले आहेत, तर सर्व प्रमुख धरणांनी तळ गाठला असल्याचे भयाण चित्र इगतपुरी तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.सुरुवातीच्या काळात झालेल्या वादळी पावसाच्या पाण्यावर तालुक्यात शेतकऱ्यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत याच पाण्याच्या भरवशावर भाताच्या पेरण्या केल्या होत्या. आता दमदार पाऊस होईल या अपेक्षेवर जमिनीच्या पोटात टाकलेले धान्य काही दिवसातच कोम धरून वर आले; परंतु त्यानंतर मात्र पावसाने सर्वत्र पाठ फिरविली. हळूहळू पाण्याअभावी या रोपाची वाढ खुंटली आणि उन्हाच्या तडाख्याने ही पिके जळू लागली. काही शेतकऱ्यांनी मात्र ही रोपे वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत जवळील धरण, नदी-नाले, विहिरी यांचे पाणी भरले; परंतु कालांतराने पाण्याचे हे स्रोत आटू लागले. यावरही मात करीत काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टॅँकरने ही रोपे वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.मागील वर्षी १५ जूनपर्यंत सर्वत्र भात लावणी पूर्ण झाली होती. यावर्षी जून उलटून गेला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्याचे डोळे पाणावले आहेत. तालुक्यातील विहिरी, धरणे, नद्या यांनीदेखील तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जनावरांना चाराही नाही, अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईने गंभीर रूप धारण करीत अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असताना मात्र इगतपुरी पंचायत समिती याकडे दुर्लक्ष आणि काणाडोळा करीत असल्याने अनेक गावांतील महिला पाणी कुठून मिळवावे या विवंचनेत आहेत. याबाबत स्थानिक ग्रामसेवकाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामसेवकही दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)