शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरयूनगर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग ; घनकचरा विभागाचे दुर्लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:36 IST

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढिग साचले आहेत.

ठळक मुद्देनाशिक शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग शहयुनगर रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रकार कचऱ्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त

नाशिक : शहरात लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. ‘स्मार्ट’ शहराकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची घडी व्यवस्थित बसलेली असतानाही काही मंडळी विशिष्ट ठिकाणी कचरा फेकण्यातच धन्यता मानते. अशा मंडळींकडून घरातील तसेच छोटे-मोठे समारंभ यामधून जमा होणारा कचरा कमी वर्दळीच्या वेळेत अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला फेकण्याचे प्रकार सुरू झाले असून इंदिरानगर परिसरातील शरयूनगर रस्त्यावर अशाचप्रकारे डेब्रीजसह विविध प्रकारच्या कचऱ्याचे ढिग साचले आहेत. इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग निर्माण झाले असून, महापालिके च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. नाशिकमधील वाढत्या शहरीकरणासोबतच नागरी वस्तीही वाढत असलेल्या इंदिरानगर परिसरातील जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर परिसरातील काही नागरिकांकडून कचरा फेकून अस्वच्छता पसरविली जात आहे. तसेच भाजी विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांसोबतच हातगाड्यांवाल्यांकडून या भाागात नियमित घंटागाडी येत असतानाही असा प्रकार सुरू असून, महापालिके च्या घनकचरा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात शिळे अन्न आणि इतर ओल्या कचºयाचा समावेश असल्याने या भागात मोकाट श्वानांचा उपद्रवही वाढला आहे, त्यामुळे या रस्त्याने सकाळी व सायंकाळी धावण्यासाठी आणि चालण्यासाठी बाहेर पडणाºया नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या भागात सातत्याने अन्नपदार्थ मिळत असल्याने येथे जमा होणाऱ्या मोकाट श्वानांनी परिसरातील निवासी वसाहतींमध्येच निवारा शोधल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेने रस्त्यावर कचरा फेकणाºयांविरोधात तसेच कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. मात्र या भागात अनेक जण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा फेकत असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा फेकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.