नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिलाबाई बोडके बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीस मावळते सरपंच सुदाम बोडके, उपसरपंच शिला बिन्नर, नामदेव भिसे, संदीप बोडके, यशोदा सदगिर, सविता कातोरे आदी सदस्यांच्या उपस्थितीत निर्धारीत वेळेत सरपंचपदासाठी पिलाबाई बोडके यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडक निर्णय अधिकारी गाडे यांनी बोडके यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ननिर्वाचित सरपंच बोडके यांचा सुदाम बोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी ग्रामसेवक एम. टि. भनगीर, रघुनाथ दराडे, राम दराडे, कैलास बोडके, बबन बोडके, रामभाऊ बोडके, भारत कडभाने, सोमनाथ बोडके, प्रदीप साळवे, निवृत्ती होलगीर, विष्णू बोडके, साहेबराव बिन्नर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:19 IST
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिलाबाई बोडके बिनविरोध निवड करण्यात आली.
मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध
ठळक मुद्देफटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.