शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

By admin | Updated: September 7, 2014 00:22 IST

मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र

 

नाशिक : सेना-मनसेपेक्षाही अल्प संख्याबळ बाळगून असलेल्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदावर दावा ठोकून दोन्ही (मित्र) पक्षांना अडचणीत आणण्याची खेळी खेळली असली व महापौरपदाबाबत भाजपाने कोणतीही भूमिका घेतली तरी, त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणे अटळ असल्याचे मानले जात आहे. एकीकडे सत्तेच्या सौद्यात अगणित महत्त्व प्राप्त झाल्याच्या आनंदात भाजपा रममाण होत असताना दुसरीकडे महापौरपदावर दावा सांगणाऱ्या मनसे-सेनेने भाजपाचीच अप्रत्यक्ष कोंडी केल्याचेच चित्र दिसू लागले आहे. महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत (अलीकडचा अपवाद वगळता) नेहमीच फरफट पदरी पडणाऱ्या भाजपाने मनसेशी युती करून स्वत:भोवती काही काळापुरते महत्त्व निर्माण केले असले तरी, ते कायमच टिकेल याविषयी पक्षाच्याच नेत्यांना शाश्वती नाही. विशेष करून होऊ घातलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट महापौरपदावर दावा ठोकून मनसे व सेनेला पायधूळ झाडायला लावल्यामुळे भाजपाची मंडळी खुशीत असून, त्यातच नाशिक दौऱ्यावर येऊन गेलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही महापौरपदाबाबतची संदिग्धता कायम ठेवल्याने त्यात भर पडली आहे. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मनसेची सुरू असलेली घालमेल व सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापौरपद खेचून आणण्यासाठी आसुसलेली सेना याचा नेमका लाभ उचलण्याचा भाजपाने प्रयत्न चालविला आहे. विशेष करून विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सेनेचे नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. महापौरपदाच्या मोबदल्यात नाशिक शहरातील विधानसभा मतदारसंघाच्या जागांची अदलाबदल टाळण्यात सेनेला भाग पाडणे किंबहुना एखाददुसरी जागा अधिकची पदरात पाडून घेता येणे शक्य आहे, काय याची चाचपणी भाजपाकडून केली जात आहे. प्रत्यक्षात भाजपाच्या या प्रयत्नांतून त्यांचीच कोंडी करण्याची खेळी सेना आखत आहे. महापौरपद निवडणुकीसाठी भाजपाने मनसेला साथ दिली, तर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेनेकडून साहजिकच नाशिक महापालिकेतील मनसेच्या कारभारावर व शहरातील तीन आमदारांच्या कार्यकाळावरच भर दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत त्याच मनसेच्या गैरकारभारात भाजपाही सहभागी झाल्याचा संदेश मतदारांपुढे जाणार असल्याने त्याचा फटका भाजपा उमेदवार उभ्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कसा बसेल, याची व्यूहरचना सेनेने सुरू केली आहे. महापालिकेत मनसेसोबत व विधानसभेत सेनेबरोबर अशी दुहेरी भूमिका भाजपाला घेता येणार नाही. महापालिकेपेक्षाही भाजपाला राज्याची सत्ता अधिक महत्त्वाची आहे हे विशेष. (प्रतिनिधी)