द्याने - कत्तलीसाठी पाच गायी व पाच गो-हे घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या वाहनाला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यातील जनावरांची सुटका केली.ही घटना बागलाण तालुक्यातील आनंदपुर येथे रात्री २.३०च्या सुमारास घडली. कत्तलीसाठी अवैधरित्या गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व त्याच्या साथीदारांविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.अन्य तीन ते चार साथीदारांनी अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला आहे. परिसरात जनावरे चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडत असून शेतकरी धास्तावले असून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.