शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:59 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

ठळक मुद्दे वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे गावालगत बिबटयाचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.गोंदे दुमाला, मुकणे व वाडीवºहे शिवहद्दीत बिबटयांचा वावर नेहमीचाच झाला असून धरण क्षेत्र, ऊस व जंगल यामुळे वन्य प्राण्याबरोबर बिबट्यांचे भक्षासाठी गावाकडे व वस्तीच्या ठिकाणी फिरणे वर्षभरापासून नेहमीचे झाले आहे. त्यातच सोमवारी पहाटेच्यावेळी एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना ताजी असतांनाच बुधवारी (दि.३०) सकाळी ९ वाजे दरम्यान मुकणे धरणाच्या दिशेने एक बिबट्या येतांना शेतावर जाणाºया काही महिलांनी पाहिला असता त्यांचीही काहीवेळ भंबेरीच उडाली. धरणाच्या दिशेने आलेला बिबट्या गावाजवळच वाडीवºहे-मुरंबी रस्त्यावर रामदास शेजवळ यांच्या शेतात घुसल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. या ठिकाणी भवानी देवीचे मंदिर असल्याने सर्वांचाच सतत वावर असतो त्यामुळे वनवीभागाने पिंजरा लावावा अशी मागणी नागरिक करित होते.दरम्यान सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी वनविभागाला कळविले असता वनविभागाच्या महिला वनरक्षक शालिनी पवार, पी. जी. साबळे यानी बिबट्या असणाºया ठिकाणी भेट देऊन खात्री करण्यासाठी थांबुन राहिल्या मात्र गवताच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या भरपूर वेळ झाला तरी शेताबाहेर येत नव्हता.  दरम्यान सोमवारी पहाटे गोंदेदुमाला येथील शिवारात बिबट्या वनविभागाच्या पिंजºयात अडकल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असतांनाच, पुन्हा जवळच दुसरा बिबट्या शेतात घुसल्याने ग्रामस्थ अद्यापही भीतीच्या छायेत असुन अजूनही बिबटे मुकणे, गोंदेदुमाला, वाडीवºहे या गावच्या शिवहद्दीत असल्याने अनेकदा मागणी करूनही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने या परिसरातील बिबट्यांचा वावर वाढला आहे. सदर ठिकाणासह या परिसरातील बिबटे असणाºया ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.