शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपचालकानेच केला १६ लाख लुटीचा बहाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:22 IST

पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे.

पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे. घटनेनंतर पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची कसून चौकशी केली असता रोकड लुटीचा प्रकार घडलाच नसल्याची कबुली देत स्वत:च सोळा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पत्नीकडे देऊन दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळवून नेल्याचा खोटा बनाव करून पोलिसांना माहिती कळविल्याचे सांगितले.

याबाबत माहिती अशी की, आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात पेट्रोल पंप असून, शनिवार ते सोमवार अशा सलग तीन दिवस बँक बंद असल्याने पेट्रोल पंपावर सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा झाली होती.मंगळवारी दुपारी पेट्रोल पंपमालकाने आपण बँकेत रोकड भरण्यासाठी जात असल्याचे पेट्रोल पंपावर काम करणाºया काही कर्मचाºयांना सांगितले. त्यानंतर लाखलगाव येथे गेल्यानंतर त्याने रोकड असलेली बॅग पत्नीकडे दिली व नंतर पेट्रोल पंपावर फोन करून बँकेची स्लिप विसरल्याचे सांगून एका विश्वासू कर्मचाºयाला बोलावून घेतले, त्यानंतर पुन्हा थोड्यावेळाने पेट्रोल पंपावर व आडगाव पोलीस ठाण्यात फोनवरून रोकड लुटीची माहिती कळविली.भरदिवसा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा काहीशी हादरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पोलीस कर्मचाºयांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची चौकशी केली असता त्याने सुटीमुळे बँक बंद असल्याने बँकेत सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगून बँकेची स्लिप विसरल्याने रस्त्यावर थांबलो होतो, त्यातदरम्यान काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळविल्याचे सांगितले.पितळ उघडसुरुवातीला पोलिसांना प्रकार काहीसा खरा वाटला, मात्र सदर प्रकाराबाबत पोलिसांनी उलटसुलट चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपचालकाचे बिंग फुटले. त्याने स्वत:च रोकड लुटीचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. आडगाव पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळेच सत्य बाहेर आले व पेट्रोल पंपचालकानेच कसा बनाव केला याचे पितळ उघड झाले.