शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पेट्रोलपंप उद्या बंद

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

जिल्ह्यातील पेट्रोलपंप उद्या बंद

नाशिक : संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेलवर सारखाच कर असावा या मागणीसाठी नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने येत्या सोमवारी (दि़ ११) पेट्रोल-डिझेल विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे़ शासनाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ३२० पेट्रोलपंप २४ तास बंद राहणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सचिव विजय ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील २६ शहरांमध्ये एलबीटी लागू करण्यात आला आहे़ सोन्यासारख्या चैनीच्या वस्तूवर ०़१ टक्के एलबीटी, तर जीवनावश्यक असलेल्या पेट्रोल व डिझेलवर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत एलबीटी लावला जातो़ यामुळे ग्राहकांना जादादराने पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागते़ तसेच इतर राज्यांमध्ये कमीदरात पेट्रोल मिळत असल्याने व्रिकी कमी असून, व्यवसायावरही परिणाम झाला आहे़ या सर्व गोष्टींचा विचार करून पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांची राज्य संघटना फ ामडाने १ आॅगस्टला बैठक घेतली़ या बैठकीत ११ आॅगस्टला २४ तासांचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला़ मुंबईत कच्च्या तेलाची आयात होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एसएससी टॅक्स लावला जातो़ (पान २ वर)या टॅक्समुळे डिझेल तीन रुपयांनी, तर पेट्रोल २़५० रुपयांनी महाग झाले आहे़ या तुलनेत बाहेरील राज्यात भाव कमी असल्यामुळे राज्याच्या सरहद्दीवरील पेट्रोलपंपचालकांच्या विक्रीवर मोठा परिणाम होतो़ एलबीटीऐवजी ३० पैसे प्रतिलिटर अधिभार आकारावा ज्यामुळे सर्व राज्यात सारखाच कर लागेल व किमान दोन ते सहा रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, असेही ठाकरे यांनी सांगितले़पेट्रोल असोसिएशनने ११ तारखेचा लाक्षणिक संप पुकारलेला असून, यावरही शासनाने निर्णय न घेतल्यास बेमुदत बंदचा इशाही देण्यात आला आहे़ यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव टाकेकर, तेहसीन खान, देवीदास पालिजा, बकुळ गांधी, बापू वावरे, साहेबराव महाले आदिंसह पेट्रोलपंपचालक उपस्थित होते़(प्रतिनिधी)