शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे भाव... अब की बार सौ के पार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:28 IST

नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रतिलीटरचे दर शंभरकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी ...

नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रतिलीटरचे दर शंभरकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने ‘अब की बार सौ के पार’ असे लिहिलेला केक कापून शनिवारी (दि. २७) अभिनव आंदोलन करण्यात आले.

पेट्रोलचे दर आता ९७ रुपये २५ पैशांपर्यंत पोहोचले आहे तर स्पीड पेट्रोलचे शंभर रुपयांवर पोहाेचले आहेत. या दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांना आता वाहन चालवणे कठीण झाले असून त्या मुळेच पेट्रोलच्या दरवाढीकडे सकारात्मक बघा असे सांगणारे उपरोधिक आंदोलन नाशिकरोड येथे खान पेट्रोल पंपावर करण्यात आले. केकवर शंभराचा आकडा लिहून त्यावर ‘अब की बार सौ के पार’ असा संदेश देण्यात आला होता आणि त्या खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे किक्रेट खेळतानाचे तसेच शतक झळकावल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करतानाची चित्रे देखील लावण्यात आली होती. पेट्रोल पंपावर केक कापल्यानंतर तो याच ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आला आणि पेट्रोलच्या चढत्या दरांमुळे महागाई कशी वाढते आहे, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारला पेट्रोलची शंभरी पार करण्यासाठी चिअर अप करण्यात आले.

एनएसआयुआयचे जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, ओमकार गोडसे, आकाश गावडी, पंकज पवार, हितेश डोईफोडे, तन्नू शेख, विशाल जाधव,रोशन उज्जैनवाल, अनिकेत जाधव, अजिज शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

===Photopath===

270221\27nsk_57_27022021_13.jpg

===Caption===

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ एनएसआयुआयच्या वतीने केक कापूनअभिनव आंदाेलन करताना  जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, ओमकार गोडसे, आकाश गावडी, पंकज पवार, हितेश डोईफोडे, तन्नू शेख, विशाल जाधव,रोशन उज्जैनवाल, अनिकेत जाधव, अजिज शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते.