शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका संपताच पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

नाशिक : देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पाँडिचेरी या पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना इंधन दरवाढीचा ...

नाशिक : देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पाँडिचेरी या पाच राज्यांमधील निवडणूक संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना इंधन दरवाढीचा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या भाववाढीमुळे मंगळवारी नाशिक शहरात (दि ४) पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २८ पैसे महागले आहे. या दरवाढीने नाशकात एक लिटर पेट्रोलचा भाव ९७.२४ रुपये झाला आहे, तर डिझेल ८७.१० रुपये झाले आहे.

पेट्रोल डिझेलच्या किमतीत ही वाढ जवळपास दोन महिन्यांनी झाली आहे. याआधी २७ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली होती. त्यानंतर काही पैशांची घसरण झाल्यानंतर आता दोन महिन्यांनी पुन्हा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारकडून पेट्रोल,डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल,डिझेलच्या भावात होणारी घसरण अथवा भाव स्थिरावणे आणि निवडणुकानंतर पुन्हा होणारी भाववाढ याचा सामान्य ग्राहकांकडून संबंध जोडला जात आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या तेल कंपन्यांवपर दबाव निर्माण करून इंधनाचे भाव नियंत्रित करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप आता पेट्रोल,डिझेलच्या ग्राहकांकडून केला जाऊ लागला आहे.

कोट-

पेट्रोल,डिझेलचे दर नियंत्रणमुक्त असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुकांच्या तोंडावरच भाव कमी होतात आणि निवडणुकानंतर तात्काळ पुन्हा भाववाढ सुरू होते, हे निश्चितच शंकास्पद आहे. यावरून सरकार अप्रत्यक्षरीत्या भाव नियंत्रित करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- किरण टिळे, ग्राहक

--

पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या किमतीमध्ये निवडणुकांच्या तोंडावर होणारी कपात ही नागरिकांचे लक्ष महागाई‌वरून हटविण्यासाठीच केली जात असल्याची साशंकता आहे. दर नियंत्रणमुक्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरूनही ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नाही. मात्र निवडणुकांच्या तोंडावर भाववाढ थांबविली जाते अथवा तेलाच्या किमती कमी केल्या जातात, त्यामुळे इंधन तेलाचे दर निश्चित करणाऱ्या यंत्रणांवर सरकारचा दबाव असल्याची साशंकता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

- सागर चव्हाण, ग्राहक

अशी आहे इंधन दरवाढ

महिना - पेट्रोल - डिझेल -

१ नोव्हेंबर - ८८.२१- ७६.१६

१ डिसेंबर - ८९.४४ - ७८.२०

१ जानेवारी - ९०.७६ - ७९.७१

१८ जानेवारी ९२.०२ - ८१.०८

१ फेब्रुवारी - ९३.२८ - ८२.४५

१७ फेब्रुवारी - ९६.६८ -८६.३४-

३० मार्च - ९७.३४ - ८६.९६

१५ एप्रिल - ९७.१८ - ८६.८२

४ मे - ९७.४२ - ८७.१०