शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:19 IST

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़

ठळक मुद्देललिता शिंदे : सदस्यसंख्या वाढविण्याची न्यायालयाकडे मागणीभाविकांनाही उच्च प्रतिच्या सुविधा का मिळू नये? असा प्रश्न

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़देवस्थानावरील विश्वस्तांची संख्या वाढविण्याबरोबरच सर्व विश्वस्तांना ठराविक कालावधीसाठी अध्यक्षपदाची संधी मिळावी, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे़ शिंदे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची एक हजार हेक्टर जमीन असून, यामधील विविध घोटाळे बाहेर येत आहेत़ त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी ट्रस्टचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही़ याचे प्रमुख कारण म्हणजे विश्वस्त मंडळाची मर्यादित संख्या असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ या याचिकेची पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे़ या विश्वस्त मंडळात महिलांसाठी आरक्षण असावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे़ त्र्यंबकेश्वर देवस्थान ही पब्लिक ट्रस्ट असल्याने देवस्थानचे अध्यक्षपद जनतेतून येणाºया प्रतिनिधींना मिळावे, सद्य: स्थितीत हे अध्यक्षपद कायमस्वरूपी असल्याने या ठिकाणी एकाधिकार शाही होत आहे़ यामुळे इतर विश्वस्तांच्या मताला कोणतीही किंमत राहत नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे़जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या त्र्यंबकच्या विश्वस्तांची जबाबदारी वाढली आहे़ गत अनुभवावरून भाविकांच्या हिताचे विविध विषय समोर आले, त्यानुसार निर्णय घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला असता तो बहुमताने हाणून पाडला जातो़ धर्मादाय आयुक्तांकडून निवडलेले चार सदस्य अल्पमतात असता़ भाविकांचा सोयी, सुविधा कशा उभारता येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ देशातील विविध देवस्थानांमध्ये मिळणाºया सुविधांचा विचार करता त्र्यंबकेश्वरला येणाºया भाविकांनाही उच्च प्रतिच्या सुविधा का मिळू नये? असा प्रश्न ललिता शिंदे यांनी उपस्थित केला आहे.