शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलच्या वृक्षतोडीसाठी लवकरच याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:49 IST

अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहेरून येणाºया रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेनेही इन्क्युबेटर वाढविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.

अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहेरून येणाºया रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेनेही इन्क्युबेटर वाढविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.जागेच्या अडचणीमुळे नवजात शिशुगृहाचे विस्तारिकरणात अडथळा निर्माण झाल्याची बाब अर्भकांच्या मृत्यूच्या वाढलेल्या संख्येवरून समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेले वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. तथापि, महापालिकेच्या अखत्यारित ही बाब येत नसल्याचे महापालिकेने कळवूनही जिल्हा रुग्णालयाने त्याकडे दुर्लक्ष केले परिणामी विस्तारित कक्षाचे काम करता येऊ शकले नाही. वृक्षतोडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज असल्याने यासंदर्भात पुढच्या आठवड्यात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील नवजात शिशू उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल केले जातात ते पाहता, महापालिकेने दहा इन्क्युबेटर बसविण्याची तयारी दर्शविली असून, त्यात आणखी वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात त्या प्रमाणात पुरेशी आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.