शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एमईटी विरोधातील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:41 IST

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील चार महाविद्यालयांच्या अवास्तव फीबाबत सुनील कर्वे व बाळासाहेब जांबुळकर यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने एकदा फेटाळूनही त्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे.

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील चार महाविद्यालयांच्या अवास्तव फीबाबत सुनील कर्वे व बाळासाहेब जांबुळकर यांनी दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने एकदा फेटाळूनही त्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती याचिकादेखील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे.  मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नाशिक येथील संस्थेच्या चार महाविद्यालयांच्या फीसंदर्भात बाळासाहेब जांबुळकर यांनी दि. २८ मार्च २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात एमईटी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका जनहितासाठी नव्हे, तर एमईटी व पयार्याने भुजबळांच्या बदनामीच्या हेतूने केलेली याचिका आहे असे संबोधून ही याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल सुनील कर्वे व बाळासाहेब जांबुळकर यांनी दाव्याच्या खर्चापोटी प्रत्येकी पन्नास हजार रुपये द्यावे असे आदेशही दिले होते.  या निर्णयाच्या विरोधात जांबुळकर यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून कोर्टाने सुनावलेला ५० हजार रुपयांचा दंड माफ करावा. न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिक असण्यावर प्रश्न उपस्थित करून नोंदविलेल्या नोंदी रद्द करण्यात याव्या तसेच या निर्णयाचा भुजबळांना इतर खटल्यांमध्ये वापर करता येऊ नये अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत सदर याचिका रद्द ठरवून दंड कायम ठेवला. त्यामुळे नुकत्याच जामिनावर सुटलेल्या भुजबळांना आणखीन एक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ