लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पेठरोड परिसरातील ११ वर्षीय मुलास स्कुटीवरून बसवून नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास डाळींब मार्केटच्या पाठीमागील शौचालयाजवळ घडली़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित काळू चव्हाण (रा़ भराडवाडी, पंचवटी) याने ११ वर्षीय अलपवयीन मुलगा व त्याच्या मित्रास स्कुटीवरून बसवून पेठरोडवरील डाळींब मार्केटच्या पाठीमागील शौचालयाजवळील खड्ड्यात घेऊन गेला़ या ठिकाणी अनैसर्गिक अत्याचार केला़ यानंतर याबाबत घरी काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित चव्हाणविरोधात अनैसर्गिक अत्याचार तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
पेठरोडला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By admin | Updated: June 16, 2017 18:31 IST