शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पेठ : संतप्त विद्यार्थिनींनी गाठले तहसील कार्यालय; सुरक्षितता वाºयावर मुलींचे वसतिगृह समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:22 IST

पेठ : येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींना समस्यांचा सामना करावा लागत असून, गैरसोयींनी त्रस्त विद्यार्थिनींनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट तहसील कार्यालय गाठून समस्यांचा पाढा वाचला

ठळक मुद्देगृहपाल व ठेकेदाराकडून अपमानास्पद वागणूकअस्वच्छतेमुळे आजाराच्या प्रमाणात वाढ

पेठ : येथील आदिवासी विकास विभाग संचलित मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, गैरसोयींनी त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट तहसील कार्यालय गाठून समस्यांचा पाढा वाचला. गृहपालाची नियमित गैरहजेरी, दूषित पाण्याचा पुरवठा, अस्वच्छतेमुळे आजाराच्या प्रमाणात वाढ, निकृष्ट प्रकारचे जेवण, गृहपाल व ठेकेदाराकडून अपमानास्पद वागणूक, दंडाच्या नावाने अनधिकृत रकमांची वसुली आदी समस्या तहसीलदार हरीश भामरे यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रसंगी जि. प. सदस्य भास्कर गावित, सदस्य विलास अलबाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, किरण भुसारे, नगराध्यक्ष लता सातपुते, आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष लकी जाधव, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, तालुकाध्यक्ष युवराज भोये, नगरसेवक प्रतिभा पाटील, कुमार मोंढे, प्रकाश धुळे, राजेंद्र कहाणे, राजेश पाटील, भूषण कामडी, शैलेश राऊत, अमोल तलवारे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हरीश भामरे यांनी तत्काळ दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांना चौकशी करण्याबाबत निर्देश दिले. मात्र आदिवासी विकास विभागाने ठोस भूमिका न घेतल्याने सायंकाळी मुलींनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर बैठा सत्याग्रह करीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. गृहपालावर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही न घेण्याचा मुलींनी पवित्रा घेतला होता.दूषित पाण्याचा होतो पुरवठायेथील शासकीय वसतिगृहाला ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो त्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने ऐन थंडीत मुलींना कुडकुडत राहावे लागत आहे. गृहपाल वारंवार गैरहजर राहत असल्याने शेकडो मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरआला आहे.