शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

पेठ - दिंडोरीत तालुक्यात प्रचार शिगेला

By admin | Updated: October 13, 2014 00:48 IST

पेठ - दिंडोरीत तालुक्यात प्रचार शिगेला

दिंडोरी : पेठ - दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला असून, यंदा कोणत्याही जाहीर आरोप-प्रत्यारोपाशिवाय निवडणूक रंगली असून, आमदार धनराज महाले, माजी आमदार नरहरी झिरवाळ, रामदास चारोस्कर यांच्यात काट्याची लढत असून, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात वेगवेगळी राजकीय समीकरणे बनली आहेत. जातीय समीकरणात मतदार कुणाचे स्वप्न साकार करतात अन् कुणाला घरी बसवतात याच्या पैजा लागू लागल्या आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत दिंडोरीत अटीतटीची लढाई कायम असून, जातीपातीच्या राजकारणाने जोर धरला आहे. यंदा जाहीर आरोप प्रत्यारोपाऐवजी प्रत्येकाने मीच कसा विकास करू शकतो यावर भर देत आपली मतपेढी आतापर्यंत सांभाळली आहे. तिन्हीही आमदारांकडे ठराविक मतांचा गठ्ठा असून, या मतांच्या फोडाफोडीवर एकमेक टपून असून, सर्वांनी राजकीय व्यूहरचना आखली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहे. राष्ट्रवादीने शरद पवार, छगन भुजबळ काँग्रेसने राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, तर शिवसेनेने रामदास कदम यांच्या सभा आयोजित करत वातावरण पेटवले आहे. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचे कुटुंबीयही मैदानात उतरले आहे. मोठ्या गावांमध्ये प्रचार फेऱ्यांवर भर दिला जात आहे. या प्रमुख तीन प्रतिस्पर्ध्यांबरोबरच भाजपाचे अशोक बुरंगे मनसेचे सुधाकर रावूत माकपाचे दत्तू पाडवी यांनी ही प्रचारात कुठे कमी ठेवली नसून हे कुणाचे किती मते खातात यावर बरेच काही अवलंबून आहे. मतदारसंघातील दिंडोरीच्या पूर्व भागातील व पेठ तालुक्यातील मतदार कुणाला तारणार यावर निकाल अवलंबून राहणार आहे. (वार्ताहर)