शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे एकच वैद्यकीय अधिकारी

By admin | Updated: December 31, 2015 22:33 IST

ग्रामीण रु ग्णालय : रुग्णसेवेवर परिणाम; आदिवासी रुग्णांची हेळसांड

पेठ : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याच्या भरवशावर रुग्णांना उपचार सुरू असून, यामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे.पेठ येथे ३० खाटांचे रु ग्णालय असून, दररोज जवळपास ३०० रु ग्ण उपचारासाठी येत असतात. आंतर व बाह्यरु ग्ण विभाग पाहण्यासाठी एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याला २४ तास ड्यूूटी बजवावी लागत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री दाखल होणाऱ्या रुग्णांचा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर भार येत आहे.पेठ तालुका अतिदुर्गम असल्याने शिवाय नागरिकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने रु ग्णांना शासकीय दवाखान्याच्या भरवशावर रहावे लागते. ग्रामीण रुग्णालयात अपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना खासगीत महागडे उपचार करून घ्यावे लागत आहेत. शासनाने भव्य अशी टोलेजंग इमारत बांधली आहे. दाखल होणाऱ्या रु ग्णांची संख्याही मोठी असून, केवळ वैद्यकीय अधिकऱ्यांअभावी रु ग्णसेवा डळमळीत झाली आहे.पेठ तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्याही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा सलाईनवर असल्याचे दिसून येते. पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात आठवड्याला दहा ते पंधरा प्रसूतीचे रुग्ण दाखल होत असतात तर रात्री अपरात्री अपघात झाल्यास एका अधिकाऱ्यावर कामाचा भार येत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर )