शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पेठ शहरातील वाहतुकीची कोंडी ठरतेय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:57 IST

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व दोन्ही राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील औद्योगिक दळणवळणासाठी महत्वाचा असलेला नाशिक- पेठ - पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग पेठ शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने शहरात होणारी वाहतुकीची कोंडी सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

रामदास शिंदेपेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा व दोन्ही राज्यासह राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील औद्योगिक दळणवळणासाठी महत्वाचा असलेला नाशिक- पेठ - पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग पेठ शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने शहरात होणारी वाहतुकीची कोंडी सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.पेठ शहराची लोकसंख्या वाढू लागली तसतशी व्यावसायिक दुकानांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. त्यात शहराचा विस्तार झाला असला तरी व्यावसायिकदृष्टया शहरातून जाणारा बलसाड रस्ता ही एकमेव बाजारपेठ असल्याने स्थानिक सह आजूबाजूच्या खेड्यावरून येऊन व्यवसाय करणाऱ्यांनी याच रस्त्यालगत दुकाने थाटल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा निवासी घरे, त्यापुढे व्यावसायिक दुकान व दुकानासमोर रस्त्यावर वाहनांची पार्कींग यामुळे वाहतुकीसाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. या रस्त्यावरून मोठया प्रमाणावर अवजड वाहने ये जा करत असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर किमान तास दोन तास वाहतुकीची कोंडी होत असते. शिवाय याच रस्त्यावर पंचायत समिती, ग्रामीण रु ग्णालय विविध बँका व सार्वजनिक कार्यालये असल्याने शासकिय कामासाठी आलेल्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होतांना दिसून येते. पेठ शहरात प्रवेश करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर टपऱ्यांचे दर्शन घडते. गावात व्यावसायिकांनी केलेले अतिक्र मण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.बायपासचा प्रस्ताव लालफितीत गत दोन वर्षापासून नाशिक ते गुजरात रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम सुरू असून पेठ शहराच्या दोन्ही बाजूला जवळपास काम पुर्ण होत आले असले तरी शहरात अजून कामाला सुरु वात करण्यात आलेली नाही. सदरचा रस्ता गावातून जाणार की शहराच्या बाहेरून जाणार याबाबत पेठवासियांमध्ये संभ्रमावस्था आहे. अनेक वेळा अतिक्र मणधारकांना नोटीसा दिल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याने नेमका रस्ता गावातून जातो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.