शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुळवंडी बीटाने पटकावला पेठ सभापती चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:06 IST

पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला.

ठळक मुद्दे जि.प. अध्यक्ष चषक : तालुकास्तरीय क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा

पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ तालुक्यातील वांगणी येथे आयोजित जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत ९४ गुण मिळवून कुळवंडी बिटाने यंदाचा सभापती चषक पटकावला.दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन जि.प. सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते वांगणी येथील आश्रमशाळेत करण्यात आले. तर दुसरऱ्या दिवशी सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाºया मुलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षी तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवणाºया बीटाला जिल्ह्याच्या धर्तीवर पेठ सभापती चषक प्रदान करण्यात येतो. कुळवंडी बीटाने सलग दुसºया वर्षी हा चषक पटकावला आहे. विशेष म्हणजे सभापती चषक देणारा पेठ हा जिल्ह्यात एकमेव तालुका आहे.सदर विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने धावपटूंना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत, नंदू गवळी, विलास अलबाड, पुष्पा पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, माजी उपसभापती महेश टोपले, मोहन कामडी, किरण भुसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले, शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोये यांच्यासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परिक्षक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, बीआरसी विषयतज्ज्ञ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदा जाधव यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.प्रथम विजेते पुढीलप्रमाणे -लहान गट -वक्तृत्व स्पर्धा - नयना भोये, इनामबारीचित्रकला स्पर्धा - जागृती दळवी, शिंदेवैयक्तकगायन - नंदिनी भोये, विरमाळवैयक्तिक नृत्य - वनिता नाठे, खिरकडेसमूह गीत गायन - जि.प. शाळा जळेसमूहनृत्य -जि.प. शाळा म्हसगण१०० मी. धावणे - वर्षा बोरसे, नाचलोंढी२०० मी. धावणे -मानस सहारे, कुळवंडीमोठा गट -वक्तृत्व स्पर्धा - प्रतिभा बिवसन, इनामबारीचित्रकला स्पर्धा - योगिता अवतार, दोनवाडेवैयक्तिक गायन - रत्ना चारोस्कर, दोनवाडेैवैयक्तिक नृत्य - भावना इमपाळ, निरगुडेसमुहगीत गायन -जि.प. शाळा,जळेसमूहनृत्य - जि.प. शाळा हातरु ंडी२०० मी धावणे - रेखा शिंगाडे , घनशेत४०० मी. धावणे - अनिल चौधरी, नाचलोंढीखोखो मुली - जि.प. शाळा, कुळवंडीखोखो मुले - जि.प. शाळा, आंबेकब्बडी मुली - जि.प. शाळा, राजबारीकब्बडी मुले - जि.प. शाळा, कळमबारी