शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

परप्रांतीय व्होट बँक ठरणार महत्त्वपूर्ण

By admin | Updated: January 11, 2017 00:43 IST

माकपाला सेना-भाजपाचे आव्हान

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून माकपाने आपली पकड निर्माण केल्याने या भागात माकपाचा अधिक प्रभाव जाणवत असला तरी नुकताच शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्याने या प्रभागात सेनेची ताकद वाढली आहे. याबरोबरच भाजपानेही याठिकाणी आपली ताकद पणाला लावली असल्याने या ठिकाणी सध्यातरी तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसत आहे, तर मनसे व कॉँग्रेस - राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. प्रभाग २६ मध्ये माकपाला शह देण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपासह अन्य पक्ष हे ताकदवार उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या प्रभागात परप्रांतीयांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मतांवरही उमेदवारांचे भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. या प्रभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागल्याने सेनेच्या उमेदवाराला परप्रांतीय मतदान करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी परप्रांतीयांच्या मतांऐवजी इतर मतदानही मोठ्या प्रमाणात असल्याने भंगार बाजार हटविल्याचा फायदा सेनेला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या प्रभागातून माकपाकडून विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, सचिन भोर, माजी नगरसेवक अ‍ॅड. वसुधा कराड आदि, तर सेनेकडून माजी नगरसेवक दिलीप दातीर, समन्वयक भागवत आरोटे, विभागप्रमुख गोरख घाटोळ यांच्या पत्नी वैशाली घाटोळ, भारतीय विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख संदीप गायकर यांच्या पत्नी हर्षदा गायकर, माजी विभागप्रमुख सुधाकर जाधव यांच्या पत्नी रंजना जाधव, उपविभागप्रमुख अरुण कुशारे यांच्या पत्नी भारती कुशारे, पुष्पावती पवार, शोभा बोराडे, शालिनी मटाले, कविता देवरे, राजश्री लोहार आदि इच्छुक आहेत, तर भाजपाकडून माजी सिडको प्रभाग सभापती अलका अहिरे, डॉ.ज्योती सोनवणे, मंडल उपाध्यक्ष निवृत्ती इंगोले, शहर उपाध्यक्ष कैलास अहिरे, अशोक पवार, उखा चौधरी, मधुकर जाधव, तर राष्ट्रवादीकडून विठ्ठल विभुते इच्छुक आहेत.