शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अटी-शर्तींवरच बांधकामांना परवानगी

By admin | Updated: February 2, 2016 23:54 IST

महापालिका : नगररचना विभागाला आदेश

 नाशिक : सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांमध्येही जागृती व्हावी या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यापुढे इमारतींच्या बांधकामांना काही अटी-शर्तींवरच परवानगी देण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले असून अटी-शर्तींशिवाय परवानग्या दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्यास जबाबदार धरले जाणार आहे. महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार इमारत बांधकाम परवानगी व भोगवटा दाखल्याबाबतच्या प्रस्तावांना व त्यासोबतच्या बांधकाम नकाशांना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत मंजुरी देण्यात येते. परंतु सदर बांधकाम परवानगी देताना मंजूर नकाशावर तसेच प्रारंभ प्रमाणपत्रात बांधकाम क्षेत्र, सदनिकानिहाय चटई क्षेत्र, खोल्यांची अंतर्गत मोजमापे व क्षेत्रफळ या बाबींचा समावेश नसल्याने सर्वसामान्य नागरिक सदनिकांची खरेदी करताना संभ्रमावस्थेत असतात. याशिवाय, तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय असलेला वाणिज्य वापर याबाबत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र अथवा नकाशावर नमूद केलेले नसल्याने सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार असल्याचे नगररचना विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी काही अटी-शर्तींवरच बांधकाम परवानगीचे प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश नगररचना विभागाला काढले आहेत. प्रामुख्याने, इमारत बांधकाम प्रस्ताव सदनिकांसाठी असल्यास त्यात सदनिकेनिहाय बांधकाम क्षेत्र (चटई क्षेत्र निर्देशांक विरहित क्षेत्र उदा. बाल्कनी, जिना, खुली गच्ची, कपाट, आर्किटेक्चरल प्रोजेक्शन आदि वगळून) तक्ता, सदनिकानिहाय चटई क्षेत्र तक्ता, खोल्यांची अंतर्गत मोजमापे व क्षेत्रफळ तक्ता आणि सदर बांधकामाचा विकास नियंत्रण नियमावलीनुसार रुग्णालय इमारत, सभागृह इमारत व शैक्षणिक इमारत आदि विशिष्ट वापर अनुज्ञेय आहेत किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक करण्यात आले आहे.