शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला कायमस्वरूपी उपाययोजना करणार : नयना गावित

By admin | Updated: March 26, 2017 22:43 IST

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधी नयना गावित यांनी शनिवारी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधी नयना गावित यांनी शनिवारी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात आयोजित बैठकीला उपस्थित राहून त्यांनी सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्नात हात घातला. नाशिक जि. प. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गावित पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला आल्या होत्या.नयना गावित यांच्या रूपाने गावित कुटुंबीयांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. पदार्पणातच त्यांनी जि. प. उपाध्यक्षपदाला गवसणी घातली आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यानंतर त्या थेट त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात दाखल झाल्या. यावेळी पंचायत समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मातोश्री निर्मला गावित या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आमदार म्हणून गेली आठ वर्षे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे तालुक्याची पाणीटंचाई मी जवळून पाहिली आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.  या परिस्थितीत धरण पाझर तलाव आदि योजना शक्य आहे काय, याबाबत पाटबंधारे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आदिंशी चर्चा करून लवकरच पाणी योजनांचा निर्णय घेण्यात येऊन पाणीटंचाई कायमची दूर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये, संपतराव सकाळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.  व्यासपीठावर जि. प. सदस्य शकुंतलाबाई डगळे, पं. स. उपसभापती रवींद्र भोये, संपत सकाळे, मधुकर मुरकुटे उपस्थित होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक संधान, जाधव या अधिकाऱ्यांसह पुरुषोत्तम लोहगावकर, दिलीप मुळाणे, पांडुरंग आचारी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष कैलास चव्हाण, जयराम मोंढे, राजेंद्र बदादे, सोमनाथ भुतांबरे, भूषण अडसरे, गणपत कोकणे, कल्पेश कदम, ललित लोहगावकर, संतोष डगळे उपस्थित होते. (वार्ताहर)