शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

स्थायीची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: June 11, 2014 00:19 IST

उमेदवारांची नावे सादर करण्याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेण्यात आली.

 

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी आज बोलावलेल्या विशेष महासभेत मनसेच्या चार, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तीन सदस्यांची निवड करण्यात आली. मनसे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने पक्षांतर्गत गोंधळाची नामुष्की टाळण्यासाठी ऐनवेळी महासभेत आपापल्या उमेदवारांची नावे सादर करण्याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेण्यात आली. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मनसेकडून अ‍ॅड. राहुल ढिकले, शीतल भामरे, दीपाली कुलकर्णी, अर्चना थोरात, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शोभा आवारे, रूपाली गावंड, राजेंद्र महाले यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्यपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असला, तरी अधिकाधिक सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा लाभ मिळण्यासाठी या समितीत एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचे राजीनामे मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतले होते. मनसेचे विद्यमान सभापती रमेश धोंगडे, सुदाम कोंबडे, रेखा बेंडकुळे, सुमन ओहोळ व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे हरीश भडांगे, कल्पना चुंभळे, सुनीता निमसे या नगरसेवकांनी समितीच्या सदस्यपदाचे राजीनामे महापौरांकडे सादर केले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सात जागांसाठी आजच्या महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेची अर्थवाहिनी असलेल्या स्थायी समितीसाठी मनसे व राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती; मात्र पक्षातील कलहाची नामुष्की ओढावू नये यासाठी ऐनवेळी नावे घोषित करण्याची खबरदारी दोन्ही पक्षांकडून घेतली गेली. इच्छुकांची भाऊगर्दी असलेल्या या दोन्ही पक्षांतील चर्चेत असलेल्या काही नावांचाच ऐनवेळी पत्ता कापल्याने त्याचा येत्या काळात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, निवड झालेल्या सर्व सदस्यांचा महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृह नेते शशिकांत जाधव, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, प्रकाश लोंढे, कविता कर्डक, लक्ष्मण जायभावे, अशोक सातभाई आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)