शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर सुरू आकडेमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:50 IST

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत.

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत.नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत म्हणजेच ५८.८२ टक्के मतदान झाले होते. यंदा ५९.४३ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ०.६१ टक्के इतके मतदान झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे मतदार संघ पूर्णत: शहरी आहेत.देवळाली मतदारसंघात मात्र संमिश्र भाग आहे, तर अन्य दोन मतदारसंघांत सिन्नर आणि इगतपुरी-त्र्यंबक हे पूर्णत: ग्रामीण भागात मोडतात. नाशिक शहरातील देवळालीसह चार मतदारसंघांचा विचार केला तर दहा लाख मतदार असून शहरी भागातील मतदारच निर्णायक ठरेल, असे मानले जात होते. परंतु सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानात ग्रामीण भागाचा समावेश ठरलेल्या मतदारसंघात अधिक मतदान झाले आहे.यात नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघांत सर्वसाधारणपणे ५५ टक्के मतदान झाले आहे. परंतु त्याव्यतिरिक्त देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या मतदारसंघात ६० ते ६८ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. त्यामुळे ते कोणाच्या पथ्यावर पडणार हे महत्त्वाचे आहे. विशेषत: सिन्नर तालुक्यात ६४.९७ टक्के मतदान झाले आहे, तर देवळालीतही ६०.७३ टक्के आणि इगतपुरीमध्ये ६७.६० टक्के इतके मतदान झाले आहे. म्हणजेच ग्रामीण भागातही मतदान जास्त झाले आहे.जाणकारांच्या म्हणण्यानुसार शहरी भागातील मतदार हा युतीकडे झुकलेला असतो तर ग्रामीण भागातील मतदार हा आघाडीकडे किंवा पारंपरिक पक्षांकडे असतो. यामुळे कोणाला संधी मिळेल याचे गणित मांडले जात आहे. काही उमेदवारांच्या मते जास्त झालेले मतदान हा एका अभिनिवेशातून झाले आहे.ग्रामीण-शहरी भागात मतांचा फरकनाशिक लोकसभा मतदारसंघातील शंभर टक्के शहरी भागातील नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य यांचा हिशेब बघितला तर ५ लाख ८८ हजार १ इतके मतदान झाले आहे. देवळाली, इगतपुरी-त्र्यंबक आणि सिन्नर या तीन मतदारसंघांत ५ लाख ३० हजार ५७५ इतके मतदान झाले आहे. म्हणजे दोघांमधील फरक तपासला तर ५७ हजार ४२६ मतांचा फरक असून त्यामुळेच ही निवडणूक अधिक अटी-तटीची असून, अंदाज बांधणे कठीण होत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.मतदान नेहमी उत्स्फूर्तपणे होते आणि टक्केवारी वाढते तेव्हा हा कौल परिवर्तनवादी असल्याचे म्हणजे सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याचे मानले जाते आणि मतदान जेमतेम होते तेव्हा मतदारांचा कल फारसा बदलाकडे नाही, असे ही मानले जाते. नाशिक लोकसभेसाठी २०१४ मध्ये ५८.८२ टक्के मतदान झाले होते. तर यंदा ५९.४३ टक्के इतके झाले आहे. म्हणजेच ०.६१ टक्के इतकी वाढ झाली आहे म्हणजे वाढ आहे, परंतु अल्प वाढ असल्याने त्यादृष्टीनेदेखील अनेकांना अंदाज बांधणे कठीण झाले आहे.केंद्र सरकार हे मजबूतच रहावे यादृष्टीने मतदान झाले आहे. शहरी भागात नेहमी फारसा बाहेर न पडणारा मतदार बाहेर पडल्याने उत्स्फूर्तता युतीच्या पथ्यावर आहे. ग्रामीण भागातील मतदानात वाढ होत असताना सिन्नरमध्ये स्थानिक उमेदवाराने निवडणूक लढवण्यामुळे मतदान जास्त झाले आहे. परंतु एकूणच मतदानाचा टक्का वाढणे हे युतीच्या पथ्यावर आहे. त्यामुळे एकंदरीतच युतीचा फायदाच झाला़- हेमंत गोडसे, उमेदवार, शिवसेनाया निवडणुकीत ग्रामीण भागात जे उत्साही मतदान झाले त्यामागे दु:खी पीडित शेतकऱ्यांची व्यथा हे कारण होते. शेतकरी उत्साहाने बाहेर पडले. त्यानंतर शहरी भागात गेल्यावेळी जे वातावरण होते त्यात बदल होता. पंतप्रधानांची फसवेगिरी पूर्णत: मतदारांच्या लक्षात आल्याने त्याचा अनुकूल लाभ झाला. यंदा मोदी लाट नव्हती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे त्रास सहन करावा लागला ते सर्वच उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले नाहीत.- समीर भुजबळ, उमेदवार, राष्टÑवादीमतदारांनी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना, भाजपा युतीच्या विरोधातील रोष व्यक्त केल्याने या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. युती आणि आघाडीच्या उमेदवारांविषयी मतदारांमध्ये असंतोष होता. अशा परिस्थितीत माझ्या अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून मतदारांना सक्षम पर्याय मिळाल्यामुळे उत्स्फूर्त मतदान झाले. सक्षम उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान केले.- माणिकराव कोकाटे, उमेदवार, अपक्ष

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक