शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

लोक अदालतमध्ये ५१ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:58 IST

इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

ठळक मुद्देइगतपुरी : १६,८४,१४० रुपये सरकारच्या तिजोरीत जमा

इगतपुरी : इगतपुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व इगतपुरी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.यावेळी व्यासपिठावर मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. एन. खान, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. के. सपकाळ, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. जितेंद्र शिंदे, सचिव वाय. व्ही. कडु, सहसचिव श्रीमती विजयामाला वाजे, जेष्ठ समाजसेवक शंकरराव डांगळे आदि उपस्थित होते.या लोकन्यायालयामध्ये इगतपुरी न्यायालयातील ५४३ प्रलंबीत पैकी ५१ प्रकरणामधुन सोळा लाख चौऱ्यांशी हजार त्रेचाळीस रु पये वसुल झाले. तर २५६९ दाखलपुर्व प्रकरणा पैकी ४१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असुन यातुन बारा लाख पंधरा हजार चारशे अडसष्ट एवढी रक्कम वसुल करण्यात आली.न्यायालयात वर्षानुवर्ष चालल्या प्रकरणामध्ये एक पक्षकार आनंदी होतो तर एक नाराज होतो. मात्र लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना न्याय मिळुन दोघेही आनंदी होतात. म्हणुन उच्च न्यायालयाच्या आदेशाने लोक अदालतचे आयोजन केले जाते. त्यात जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घेतला तर प्रकरण लवकर मार्गी लागुन पक्षकारांचा वेळ व पैसा वाचवला जाऊ शकतो असे प्रतिपादन खान यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.सदरचे लोकन्यायालय यशस्वी करणेकामी इगतपुरी न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी मनोज मंडाले, सहायक अधिक्षक श्रीमती के. डी. सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ व कनिष्ठ वकील यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी ज्येष्ठ वकील आर. जी. वाजे, ईश्वरसिंग परदेशी, इरफान पठाण, युवराज जाधव, एस. बी. पवार, डी. बी. खातळे, एन. पी. चव्हाण, ओमप्रकाश भरंडिवाल, नदीम शेख, विजय कर्णावट, एन. के. वालझाडे, पी. टी. सदगीर, शिबाना मेमन, प्रगती सुरते, त्रिशला टाटीया, विनिता वाजे, संपदा उबाळे, संध्या भडांगे, पौर्णिमा यादव, स्मिता रोकडे, धरती वाजे, मनिषा वारूंगसे आदी वकील उपस्थित होते.