शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकास साधण्यासाठी जनतेची साथ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:23 IST

निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे.

ठळक मुद्देसुभाष भामरे : निकवेल येथे व्यायामशाळा, विकासकामांचे भूमिपूजन

निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे.विकासाचा आलेख उंचावण्यासाठी जनतेच्या खंबीर साथीची गरज असल्याची भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. निकवेल येथे व्यायामशाळा व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांनी निकवेल येथे मंजूर झालेली अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा इमारत आदी कामे पूर्णत्वास आली आहे. डॉ. भामरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. डॉ. भामरे पुढे म्हणाले, गावात आता नवीन व अत्याधुनिक ग्रामपंचायत झाल्याने गावाचा कारभारदेखील आधुनिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निकवेलच्या ग्रामस्थांनी  डॉ. भामरे यांचे बैलगाडीतून स्वागत केले. याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नीलेश वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. निकवेल गावासाठी व्यायामशाळा मंजूर केल्याबद्दल उल्लेखनीय विकासकामे दिल्याबद्दल गावाच्या वतीने डॉ. भामरे यांचे आभार मानण्यात आले. डॉ. भामरे मार्गदर्शनाने गावाची विकासाकडे वाटचाल होऊन अनेक प्रश्न सुटेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामसेवक श्रीमती पवार, उपसरपंच चित्रा मोरे, उपसरपंच मुरलीधर वाघ, विवेक सोनवणे, विजय वाघ, रामचंद्र मोरे, अनिता वाघ, संजय सोनवणे, पोपट म्हसदे, भिका वाघ, नीलेश खरे, रामराव अनारे, पोलीसपाटील विशाल वाघ, संजय सोनवणे, धर्मेद्र महाजन, किरण वाघ, आबा अनारे, अशोक सोनवणे, संजय वाघ, कडू वाघ, बाजीराव अनारे, रमेश वाघ, अभिमान महाजन आदींसह ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.विकासासाठी प्रयत्नशील तरुण वर्गाकडून व्यायामशाळेची आग्रही मागणी होती ती पूर्ण करण्यात आली आहे. आता यामशाळेसाठी आधुनिक साहित्यदेखील उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन भामरे यांनी देऊन गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे वचन दिले. यावेळी फटाके फोडून व बैलगाडीतून मिरवणूक काढून भामरे यांचे स्वागत करण्यात आले.