शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

By admin | Updated: February 17, 2015 00:22 IST

नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री आमदार आर. आर. आबांच्या हस्ते बरोबर १०८ दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी झाला होता. आबांची ती नाशिकची भेट अखेरचीच भेट ठरली. आबांनी त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावली होती.आबांचे नाशिकशी संबंध नेहमीच सलोख्याचे व स्नेहाचे राहिले आहेत. ग्रामविकासमंत्री असल्यापासून ते उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होईपर्यंत आबांचे नाशिकला सातत्याने येणे-जाणे होते. नाशिकमधील सहकार क्षेत्रातील एकमेव नफ्यात असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व आर आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ आॅक्टोबर २०१४ रोेजी झाला. कार्यक्रमास कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी बरोबर दुपारी एक वाजता आबांचे कादवा साखर कारखान्यावर तयार केलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. कादवा गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी आबांनी अतिशय भावस्पर्शी व हृदयस्पर्शी भाषण करीत उपस्थितांची दाद मिळविली होती. देशभरात असलेल्या मोदी लाटेच्या विरोधात मनमिळावू व प्रामाणिक अशा आमदाराची निवड दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली. येथील लोक प्रामाणिक माणसांना सांभाळून घेतात. या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मतांसाठी अर्थकारण केले जात असताना दिंडोरी येथील जनतेने मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या उमेदवाराला मतेही दिली आणि वर्गणी काढून पैसेही दिले. येथील जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी असल्याचे आर. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले होते. तब्बल ४५ मिनिटांच्या भाषणात आबांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला होता. कार्यक्रमानंतर दुपारी अडीच्या सुमारास लगेचच आबा मुंबईला फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी गेले होते. शपथविधीनंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आबा उपस्थित होते. त्यानंतर लगेचच आबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात आबांनी हजेरी लावली नाही. नाशिकच्या कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सार्वजनिक कार्यक्रम बहुधा आबांचा शेवटचाच ठरला. दिंडोरीसह नाशिककरांना आबांची अशी ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी ठरली.(प्रतिनिधी)