शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्त बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे हजारो पेन्शनधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:09 IST

नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही.

ठळक मुद्देशाखांची संख्या सुमारे २५०च्या आसपासआर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार

नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही. वयोवृद्ध पेन्शनधारकांना नवीन वर्षातच बॅँकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहून कोेषागार कार्यालयातील कर्मचारीही बॅँकांच्या त्रासाला कंटाळले आहेत.नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजारांहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाºयाची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचाºयांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. अशा बॅँकांची व त्यांच्या शाखांची संख्या सुमारे २५०च्या आसपास आहे. त्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित कर्मचाºयाने आपल्या हयातीचा पुरावा बॅँकेकडे वा कोषगार कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते. गिरणारेत सर्वच पेन्शनधारकांवर संकटनाशिक तालुक्यातील गिरणारे व पंचक्रोशीत राहणारे जवळपास १०३ पेन्शनधारक असून, या सर्वांचे युको बॅँकेत खाते आहेत. सर्वच पेन्शनधारकांनी आपली माहिती वेळेत बॅँकेत सादर करूनही युको बॅँकेने एकाही पेन्शनधारकाची माहिती कोषागार कार्यालयाला कळविली नाही. परिणामी या गावातील सर्वच पेन्शनधारकांना नवीन वर्षात आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार असून, तसाच प्रकार नांदगाव तालुक्यातील बोलढाण येथील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत घडला आहे. येथील ४३ पेन्शनधारकांची माहिती कोषागार कार्यालयाला प्राप्त न झाल्याने त्यांचेही वेतन रोखण्यात आले आहे.