सटाणा : बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने ‘पेन्शन डे’ लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय सटाणा येथे साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे आमदार दिलीप बोरसे यांनी सरस्वतीपूजन करून कायक्रमाचे उद््घाटन केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतातून मला सेवानिवृत्ती कर्मचारीबद्दल सहानुभूती व आदर आहे. त्यांचे उतारवयातील जीवन मी जवळून बघतो. खूपच अडचणींमुळे त्यांचे जीवन व्यथित होते. शासनाकडून मिळणारे आर्थिक लाभ वेळेत मिळत नाही. त्यामुळे त्यांची कुचंबना होते. यापुढील काळात तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यात सुमारे हजार शिक्षक सेवानिवृत्त असून, त्यांचे वेतन बिल करण्यास विलंब होतो. म्हणून स्थानिक निधीमधून एक संगणक संच देणार असल्याचेही आमदार बोरसे यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश बधान यांनी सहाव्या आयोगातील वेतन त्रुटी दुरुस्त करून त्याचा लाभ येत्या मार्चपर्यंत मिळेल. तसेच २०१६ नंतरसेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगप्रमाणे वेतन निश्चित होऊन सुधारित आदेश येत्या महिन्यात येतील असे स्पष्ट केले. याप्रसंगी ७५पेक्षा जास्त वय झालेले त्यांचा शाल- श्रीफळ देऊन आमदार बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते.
बागलाण तालुक्यात ‘पेन्शन ड’े
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:28 IST