नाशिक : उसनवार दिलेल्या पैसे मागण्यासाठी गेलेल्या इसमास धक्काबुक्की केल्यानंतर लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ घडली़विजयकुमार वसंत मुंडावरे (गोविंदनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संजय वेढेकर (रा़आकाशवाणी टॉवरजवळ, नाशिक) हे ओळखीचे असल्याने त्यांना ९ लाख रुपये उसनवार दिले होते़ मुंडावरे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास उसनवार दिलेले पैसे मागण्यासाठी गेले असता वेढेकर यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणून धक्काबुक्की करीत मारहाण केली़ यामध्ये मुंडावरे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पडून नुकसान झाले़ यांनतर संशयित वेढेकर यांनी घरात जाऊन लोखंडी कोयता आणून मुंडावरे यांच्या उजव्या खांद्याजवळ व छातील मारहाण करून धमकी दिली़