सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे राज्य शासनदरबारी प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी संचालक मंडळाने सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले व निवेदन दिले. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, भुसे व आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्टाईसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी संस्थेचे शासनदरबारी प्रलंबित असलेले विविध प्रश्न सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या समोर मांडले. औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संस्थेचे पदाधिकारी व आमदार वाजे यांनी पाठपुरावा करावा, संबंधित विभागांच्या मंत्र्यांमार्फत ते प्रश्न सोडविण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले. संचालक मीनाक्षी दळवी यांनी औक्षण करून भुसे यांचे स्वागत केले, तर अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे व संचालक आवारे यांनी भुसे यांचा सत्कार केला. याप्रसंगी संचालक किशोर देशमुख, संदीप आवारे, रामदास दराडे, प्रभाकर बडगुजर, अविनाश तांबे, सुनील कुंदे, बाबासाहेब दळवी, बबन चौरे, शुक्लेश्वर वर्पे, कैलास वाघचौरे, बबन डापसे, अलोककुमार दास, सुभाष गायकवाड, विष्णू खताळे, केरू वाळुंज शिवाजी देशमुख, व्यवस्थापक कमलाकर पोटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, गोविंद लोखंडे, पिराजी पवार, अवधूत आव्हाड, अनिल कवडे, संदीप ठोक, प्रशांत रायते, समाधान गायकवाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
औद्योगिक वसाहतीचे प्रश्न प्रलंबित
By admin | Updated: September 22, 2015 22:22 IST