शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

प्रलंबित आक्षेप पूर्ण करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या विविध प्रलंबित लेखा आक्षेपांचा तत्काळ निपटारा करून सर्व विभागांचे तसेच तालुक्यांचे प्रलंबित आक्षेप तत्काळ पूर्ण करण्याचे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. प्रलंबित आक्षेपांची संख्या जास्त असलेल्या विभागप्रमुखांचा आढावा घेऊन त्यांच्याकडून विहित वेळेत काम पूर्ण करून घेण्याचे निर्देशही डॉ. गिते यांनी वित्त विभागाला दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकाºयांना सूचना

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध प्रलंबित लेखा आक्षेपांचा तत्काळ निपटारा करून सर्व विभागांचे तसेच तालुक्यांचे प्रलंबित आक्षेप तत्काळ पूर्ण करण्याचे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. प्रलंबित आक्षेपांची संख्या जास्त असलेल्या विभागप्रमुखांचा आढावा घेऊन त्यांच्याकडून विहित वेळेत काम पूर्ण करून घेण्याचे निर्देशही डॉ. गिते यांनी वित्त विभागाला दिले.शासनाने प्रलंबित शाखा निधी लेखा आक्षेपांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरीय लेखा समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक स्थानिक लेखा विभागाचे सहसंचालक गिरीश देशमुख, सहायक संचालक भालचंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकिरण सोनकांबळे आदींच्या उपस्थितीत घेण्यात आली.यावेळी सहसंचालक यांनी विविध मुद्दांबाबत चर्चा केली. यामध्ये समाजकल्याण योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थी निवड प्रक्रि या, जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत होणारी लाभार्थी निवडप्रक्रि या, सेवाप्रवेश नियमांची अंमलबजावणी, आश्वासित प्रगती रोजगार योजना, आदिवासी विभागात काम केल्यामुळे मिळणारी एकस्तर पदोन्नती, शिक्षकांचे दीर्घ मुदतीच्या कालावधीतील रजा वेतन, डांबर दराच्या तफावतीबाबतचे परिच्छेद, संगणक परीक्षा विहित मुदतीत पास न झाल्यामुळे करावयाची वेतनवसुली आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच लेखापरीक्षण करताना येणाºया अडचणी, दप्तर उपलब्ध करून न देणे याबाबतही यावेळी चर्चा झाली. लेखापरीक्षणास दप्तर उपलब्ध न करून देणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी दिले. स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालातील वसुलीचे परिच्छेद प्रलंबित असल्याचे सहायक संचालकांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार