शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावात पोहणाऱ्या तीन युवकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:27 IST

येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते.

ठळक मुद्दे नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने आतापर्यंत अवैध नळ कनेक्शन बंद करणे, पाणी वाया घालविणाºया नागरिकांना दंड ठोठावणे तसेच पाण्याचा गरजेपुरता वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अशी कामे हाती घेतली आहेत.

येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते. या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या साठवण तलावात स्वत:च्या जिवाशी खेळणाºया तीन युवकांना पालिकेने धडा शिकविला आहे; मात्र अशाच प्रकारची सुरक्षा कायमस्वरूपी ठेवावी, अशी अपेक्षा आहे. पोहणाºया युवकांना दंड केल्याने आता पोहण्यासाठी कोणीही धजवणार नाही; मात्र तलावाच्या बाजूला संरक्षक भिंत असल्याने अनेक जीव वाचतील व साठवण तलावाचे अस्तरीकरण केले तर पाणी गळतीदेखील थांबेल. पाण्याअभावी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. तसेच साठवण तलावाचे अस्तरीकरण किंवा प्लॅस्टिक कागद टाकणे यांसारख्या उपाययोजना राबविल्या तर पाणी चोरीसाठी मोठा प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने याबाबतदेखील कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.तसेच नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने आतापर्यंत अवैध नळ कनेक्शन बंद करणे, पाणी वाया घालविणाºया नागरिकांना दंड ठोठावणे तसेच पाण्याचा गरजेपुरता वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच साठवण तलावातील पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथक विशेष लक्ष पुरवीत आहे. सदर पथकाने शहर हद्दीतील विनापरवानगी चालू असलेले बोअरिंगचे काम बंद पाडून संबंधितांकडून दंड वसूल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.आचारसंहिता असल्याने प्रत्येक कारवाई गंभीरतेने करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता वापर करावा तसेच इतरांनाही पाणी मिळेल याची काळजी घेऊन नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले. (१६ येवला साठवण तलाव)