शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST

---- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी खेचली नाशिक रोड : पत्ता विचारण्याचा बहाणा करत, दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने साठ ...

----

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी खेचली

नाशिक रोड : पत्ता विचारण्याचा बहाणा करत, दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखली हिसकावून पळ काढल्याची घटना सामनगाव रोड परिसरात घडली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजुळा लक्ष्मण वाघचौरे (६० रा.शिवअमृत अपा.भागवत मळा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वाघचौरे या सोमवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या सुमनबाई भागवत यांच्या घरासमोर गप्पा मारत असताना, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण आणि मंगळसूत्र असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने ओरबाडून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

.....

कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

नाशिक : भाडेकरूची माहिती विचारत एका संशयिताने महिलेला कोयत्याचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना अशोकनगर भागात घडली. या घटनेनंतर संशयितांनी परिसरात कोयत्याचा धाक दाखवून अनेकांना शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप दुलाजी खंदारे (२७ रा.श्रमिकनगर) असे दहशत पसरविणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी ललित दिनेश गवांदे (रा.राज्य कर्मचारी वसाहत) याने तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.८) संशयिताने गवांदे यांचे घर गाठून पूर्वी राहत असलेल्या भाडेकरूची माहिती घेतली. यावेळी कावेरी गवांदे यांनी त्यास आम्हाला माहीत नसल्याचे सांगितल्याने, संतप्त संशयिताने कोयत्याचा दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर, संशयिताने परिसरात शिवीगाळ करीत ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोयता दाखवून दहशत माजविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

.....

वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : शांतिनिकेतन कॉलनीत राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठोबा उद्धव आवस्कर (रा.सभागृहा मागे, मनपा गार्डनजवळ) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. आवस्कर यांनी सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीस नायलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवगंगा साबळे यांनी खबर दिल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.