शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बोधकथांचे फलक ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

By admin | Updated: April 19, 2016 00:36 IST

मालेगाव : अपर जिल्हाधिकारी कार्यालय झाले बोलके

 शफीक शेख मालेगाव सर्वसामान्य शेतकऱ्यांना ग्रामीण भागात शेतीच्या अनेकविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. शेतीचे वाद, भांडण-तंटे यामुळे ते वैतागतात. यातून मार्ग काढण्यासाठी कुणी मदत करीत नाही; परंतु सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत गोष्टीरूपाने मालेगावी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या ‘पोस्टर्स’द्वारे समजावून सांगण्यात आले असून, ‘अपर जिल्हाधिकारी कार्यालय’ बोलके झाले आहे.मालेगावी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतीच्या अनेक ‘केसेस’मध्ये गुरफटलेले शेतकरी तोडगा काढण्यासाठी येत असतात. त्यावेळी बराचवेळ त्यांना कार्यालयाबाहेर व्हरांड्यात ताटकळत उभे राहावे लागते.यावेळी अशा शेतकऱ्यांचा वेळ ‘कारणी’ लागावा व त्यांना कुणी फसवणार नाही. याबाबत माहिती करून देण्याचा प्रयत्न अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी केला असून, त्यांचे कौतुक होत आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘गोष्टी’ रूपाने त्यांचे प्रश्न सोडवून दाखविण्यात आले आहेत. त्यात शेतीचे जे कायदे आहेत त्यातील कूळ कायदा, सिलिंग कायदा, आदिवासी जमिनीचा कायदा, जमीन खरेदी-विक्री व्यवहार कायदा आदि विविध कायद्यांची माहिती देण्यात आली आहे.अज्ञानामुळे शेतकरी फसविला जातो. त्याची लुबाडणूक टळावी हा त्यामागील उद्देश आहे. शेतीच्या कायद्याची माहिती अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देण्यात आली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी कथा लिहून हा प्रयोग सांगलीत केला होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने अपर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी ही बाब महा राजस्व अभियानात समाविष्ट केली.सुमारे ५० शेतकरी रोजच शेतीच्या केसेससाठी मालेगावी अपर जिल्हाधिकारी कचेरीत येत असतात. केस सुरू असताना काही शेतकरी बाहेर बसून असतात. कायदेविषयक ४५ फलक येथे लावण्यात आले असून, त्याचा प्रभावी वापर होत आहे. पुस्तक आणि पत्रकांपेक्षा या फलकांमुळे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात यश आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रथमच मालेगावी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. याची परिसरात चर्चा होत आहे.