शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज हमीसाठी शिखर बॅँक सकारात्मक

By admin | Updated: May 21, 2017 00:18 IST

जिल्हा बॅँक बैठक : हरिश्चंद्र चव्हाणांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राज्य शिखर बॅँकेकडे १७८ कोटींच्या ठेवी असून, त्यापोटी आगामी खरीप हंगामात ज्यांनी पीककर्ज भरले आहे, अशा शेतकऱ्यांना वाटपासाठी दीडशे कोटींच्या पीककर्जाची हमी घेण्याबाबत सकारात्मक भूमिका राज्य शिखर बॅँकेने घेतल्याची माहिती बॅँकेचे संचालक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.भाजपा आमदार व खासदारांच्या तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. २०) नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख व राज्य शिखर बॅँकेचे अध्यक्ष एल.एम. सुखदेवे यांच्या उपस्थितीत सुभाष देशमुख यांच्या सरकारी सुरूची बंगल्यावर सकाळी बैठक झाली. बैठकीस जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तब्बल ११ संचालक उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हा बॅँकेने केलेले कर्जवाटप, त्यापोटीची थकबाकी, टॉप ट्वेन्टी थकबाकीदार यांची माहिती त्यांनी घेतली. बैठकीस जिल्हा बॅँक संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, धनंजय पवार यांच्यासह ११ संचालक उपस्थित असल्याचे कळते. सहकार मंत्र्यांशी चर्चाजिल्हा बॅँकेच्या १७८ कोटींच्या ठेवी राज्य शिखर बॅँकेकडे आहेत. त्यापोटी शिखर बॅँकेने खरिपात नाशिक जिल्हा बॅँक खरिपासाठी वाटप करणाऱ्या १५७ कोटींच्या पीककर्जाची हमी घ्यावी, अशी सूचना केल्याचे समजते. तूर्तास जिल्हा बॅँकेला सरकारकडून २५ ते ५० कोटींची मदत दिल्यास जिल्हा बॅँकेचे व्यवहार सुरळीत होतील, असे अध्यक्ष, संचालक व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा करून राज्य शिखर बॅँकेला पीक कर्जाची थकहमी आणि २५ ते ३० कोटींचे तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सहकार विभाग व राज्य शिखर बॅँक कार्यवाही करेल, असा निर्णय झाल्याचे समजते.