शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक जाहीर होऊनही कॉँग्रेस पक्षात शांतताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:13 IST

शहर कॉँग्रेसच्या निवडणुका म्हटले की सर्वच इच्छुक आपला कस पणाला लावून प्रतिष्ठेचा प्रश्न करतात, परंतु महिनाभरापूर्वी निवडणुका घेण्यासाठी आलेले निरीक्षक पुन्हा परत दौºयावरच न आल्याने सर्वच वातावरण शांत आहे. त्यामुळे इच्छुकांचे ताबूतही थंडावले आहे.

नाशिक : शहर कॉँग्रेसच्या निवडणुका म्हटले की सर्वच इच्छुक आपला कस पणाला लावून प्रतिष्ठेचा प्रश्न करतात, परंतु महिनाभरापूर्वी निवडणुका घेण्यासाठी आलेले निरीक्षक पुन्हा परत दौºयावरच न आल्याने सर्वच वातावरण शांत आहे. त्यामुळे इच्छुकांचे ताबूतही थंडावले आहे. कॉँग्रेस पक्षाची निवडणुका म्हटल्या की, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असते. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महापालिका निवडणुकीतही पक्ष अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाल्यानंतर आता मुळातच कार्यकर्त्यांत उत्साह नाही. तरीही संघटनात्मक निवडणुका म्हटल्या की कार्यकर्त्यांत उत्साह असतो. गेल्या डिसेंबर महिन्यात संघटनात्मक निवडणुकीसाठी प्राथमिक बैठक झाली. त्यानंतर सभासद नोंदणी झाली. त्यापाठोपाठ सुमारे दीड महिन्यापूर्वी रविशंकर झा यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक बैठक झाली. त्यात सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक सभासद किती, क्रियाशील सभासद किती अशाप्रकारची माहिती घेतल्यानंतर मात्र पक्षाचे निरीक्षक जे गेले ते परत फिरकलेच नाही. संघटनात्मक निवडणुकीच्या अंतर्गत आधी वॉर्ड, ब्लॉक स्तरावरच्या निवडणुका होतात आणि मग शहर जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका होत असतात, परंतु आतापर्यंत प्राथमिक निवडणुकाही न झाल्याने निवडणुका कधी होणार हा प्रश्न आहे.गेल्यावेळी शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रचंड गाजली होती. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या नियुक्तीवरून रणकंदन झाल्याने अनेक नाराजांनी त्यांची साथ सोडली, परंतु त्याचबरोबर समांतर कॉँग्रेस सुरू करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू होते. अखेरीस कॉँग्रेसमधील नाराजांची दखल घेऊन पक्षाने आकाश छाजेड यांना हटवून शरद अहेर यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखालीच कामकाज सुरू आहे. तथापि, अहेर यांनादेखील पक्षांतर्गत विरोधाला सामारे जावे लागत असून महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर विरोधकांशी हात मिळवणी करण्याबरोबरच अनेक आरोप करण्यात आले आणि समांतर कॉँग्रेसच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता निवडणुकीच्या वेळी सर्व वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.विरोधामुळे टळली बैठकसमांतर कॉँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष हटविण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच एक बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आता संघटनात्मक निवडणूक होणार असल्याने बैठक घेण्याची गरज नसल्याचे सांगून अनेकांनी बैठकीस विरोध केला. त्यामुळे बैठक टळली होती.