शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी पवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:57 IST

नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी येवल्याचे संभाजी पवार तर, व्हाइस चेअरमनपदी शशीकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे उपाध्यक्षपदी शशिकांत आव्हाड

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी येवल्याचे संभाजी पवार तर, व्हाइस चेअरमनपदी शशीकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा मजूर संघाचे तत्कालीन चेअरमन हरिभाऊ वाघ व व्हाइस चेअरमन आशा चव्हाण यांनी राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत चेअरमनपदासाठी संभाजी पवार यांच्या नावाची सूचना संचालक शिवाजी रौंदळ यांनी, तर त्यास सतीश सोमवंशी यांनी अनुमोदन दिले. व्हाइस चेअरमनपदासाठी शशीकांत आव्हाड यांची सूचना शशीकांत उबाळे यांनी, तर त्यास सुरेश भोये यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येक एकच अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी सौंदाणे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील मजूर संस्थांच्या हितासाठी व संवर्धनासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार व आव्हाड यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, योगेश हिरे, हरिभाऊ वाघ, शिवाजी कासव, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, योगेश गोलाईत, विठ्ठलराव वाजे, आशा चव्हाण आदी उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर पवार व आव्हाड समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.येवल्यात समर्थकांचा जल्लोषचेअरमनपदी संभाजी पवार यांची निवड झाल्याचे वृत्त येवल्यात धडकताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यापूर्वीदेखील पवार यांनी नाशिक जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघाचे अध्यक्षपद भूषिवले आहे. पवार यांचे येवल्यात शुक्र वारी सायंकाळी ५ वाजता येवला-विंचूर चौफुलीवर आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनौपचारिक सभा झाली. यावेळी आमदार किशोर दराडे यांनी पवार यांचा सत्कार केला. यावेळी रतन बोरनारे, आबा कदम, दिलीप मेंगळ, विठ्ठल आठशेरे, प्रमोद सस्कर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांची भाषणे झाली. यावेळी अरु ण काळे, पुंडलिक पाचपुते, रवि काळे, प्रवीण गायकवाड, मनोहर जावळे, बाळासाहेब पिंपरकर, आप्पा खैरनार, मंगेश भगत, पी. के. काळे, शरद लहरे, कैलास घोरपडे आदिंसह सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक