कळवण : इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ५८व्या नॅशनल फार्मसी वीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पदवी गटात २२, तर पदविका गटात २२ असे नाशिक जिल्ह्यातील विविध औषधनिर्माणशास्र महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.प्रत्येक महाविद्यालयात १ स्पर्धा याप्रमाणे ४० प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धेत पदवी गटात सर्वाधिक पारितोषिके कळवण येथील डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसीला मिळाली. त्यात थ्रोबॉल- मुली, खो खो मुले, फार्मा. फॅन्सी ड्रेस, सायंटिफीक पोस्टर सादरीकरण, स्वीमिंग मुली, टेबल टेनिस युगल मुली, एकल - मुली, व्हॉलीबॉल, कॅरम युगल, समूह गान या सर्व प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर वादविवाद स्पर्धा, टेबल टेनिस एकल मुली, निबंध व कॅरम एकल या प्रकारांमध्ये द्वितीय क्र मांकाचे पारितोषिक मिळाले.प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स अँड टेक्नोलॉजीचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशिपची ट्रॉफी वितरित करण्यात आली. उपविजेते पद नाशिक येथील सर एम.एस. गोसावी फार्मसी महाविद्यालयास मिळाले. पदविका गटात विजेतेपद नाशिक येथील एशियन कॉलेज आॅफ फार्मसी तर उपविजेतेपद मविप्र संचालित डी. फार्मसी कॉलेज आडगाव यासमिळाले.प्रास्ताविक राजेंद्र भांबर, मिलिंद वाघ यांनी केले. स्पर्धेचा अहवाल सहसचिव डॉ. डी.के. पाटील यांनी सादर केला. सूत्रसंचालन वंदना पाटील, शुभांगी पवार यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ. दिलीप डेरले यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुनील अमृतकर, डॉ.उपासणी, मनोज जगताप, किरण सूर्यवंशी, डॉ. नितिन हीरे, अमोल पाटील, संदीप पूरकर, डॉ. योगेश उशीर, संतोष देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
पवार फार्मसीला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:20 IST
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ५८व्या नॅशनल फार्मसी वीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पदवी गटात २२, तर पदविका गटात २२ असे नाशिक जिल्ह्यातील विविध औषधनिर्माणशास्र महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते.
पवार फार्मसीला विजेतेपद
ठळक मुद्देपदवी गट : नॅशनल फार्मसी वीक-२०२०