वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.तालुक्यातील पश्चिम पट्यातील सटाणा-तळवाडे रस्त्यावर वटार ते डोंगरेज दरम्यान मोठा खड्डे पडले असून तेथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्याचा व महत्वाचा रस्ता आहे. दररोज १० ते १५ गावातील लहान मोठे वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे सार्वजनिक बाधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्यातून मार्ग काढावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करून देखील त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.विरगांव ते वटार हा चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून बऱ्याच ठिकाणी तर खड्यांचे साम्राज्य झाले आहे. रस्त्याची चालणं झाली आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात अनेक छोटे मोठे अपघातही येथे झाले आहेत. वटार ते विरगांव हा चार किलोमीटर रास्ता शेतकºयांसाठी महत्वाचा असून हा रस्ता राज्य महामार्ग विंचुर-प्रकाशाला जोडला जातो. त्यामुळे येथील भाजीपाला टमाटे, कांदा, मिरची शेतीमालाचे उत्पन्न मोठी बाजारपेठ असलेले शहरे सूरत, अहमदाबाद, बडुच, मुंबईला जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकºयांना माल घेऊन जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच ताहाराबादकडे शिक्षणसाठी जाणाºया विद्यार्थांच्या वाहन चालकाना सुद्धा मोठी कसरत करावी लागते.उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ कपालेश्वर येथे येणाºया भाविकांना सुद्धा हाच मार्ग असल्यामुळे अनेक भाविक श्रावण महिन्यात येथे येण्याचे टाळतात तसेच परिसरातील नागरिकांना दैनंदिन दलण-वळणासाठी हाच रास्ता असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करत आहेत.चौकटविरगावं ते वटार रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून मोटरसायकलीने प्रवास करणाºयांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात कायम छोटे छोटे अपघात होत असत्ल्याने बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.कल्पना खैरनार सरपंच, वटार.
बागलाणच्या पश्चिम पट्यात सर्व रस्त्यात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:56 IST
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक ते दीड फुट खोलीच्या खड्यातून प्रवाशांना दणके बसत असल्याने आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्यात सर्व रस्त्यात खड्डे
ठळक मुद्देअपघातांच्या संख्येत वाढ : विरगाव ते वटार रस्त्याची झाली चाळण