शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या निर्मलाताई अभ्यंकर ‘सुशीला’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:44 IST

उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘सुशीला’ पुरस्कार पुणे येथील उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नाशिक : उद्योगिनी महिला नागरी पतसंस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘सुशीला’ पुरस्कार पुणे येथील उद्योजिका निर्मलाताई अभ्यंकर यांना महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलाच्या सभागृहात येथे शनिवारी (दि.२९) सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना अभ्यंकर यांनी सांगितले की, आपण ठरविले तर काहीही करू शकतो. निश्चय, प्रयत्नात सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. टाइमपास म्हणून सुरू केलेला हलव्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय आज पैसा व प्रतिष्ठा मिळवून देत असून, आपल्याबरोबर १० कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणारा ठरला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. वयाच्या ८० व्या वर्षी असे काहीतरी करू शकल्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या हलव्याच्या दागिन्यांमुळे जगभरातून पसंतीची पावती मिळत असून, महिलांनी जिद्दीने स्वत:च्या पायावर उभे राहिल्यास यश नक्कीच मिळते. स्वत:तील कलांचा शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक योगीता शेटे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती म्हात्रे, शैलजा खोडके यांनी केले. याप्रसंगी प्रबोधिनी ट्रस्टच्या रजनी लिमये, भारती बागुल, मणिबेन पटेल, माजी आमदार निशिगंधा मोगल, वैशाली वैशंपायन, ज्योती कारखानीस, अनघा फेगडे, वृषाली मोरकर, सरोज तासखेडकर, सुमेधा पंडित आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.