शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅटर्न ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:36 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांचा होणारा घोळ मिटविण्यासाठी राज्यस्तरावर एकच पॅटर्न लागू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

नाशिक : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांचा होणारा घोळ मिटविण्यासाठी राज्यस्तरावर एकच पॅटर्न लागू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतल्यानंतर या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरल्यास ग्रामपंचायतीची मुदत संपण्यापूर्वीच सहा महिने अगोदर निवडणुकीसाठी सॉफ्टवेअर ‘अलर्ट’ देणार आहे.  पंचायतराज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ग्रामीण विकास यंत्रणेचे नियंत्रण असले तरी, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी मात्र महसूल खात्यावर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रभाग रचना, आरक्षण व प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करून सरपंच, उपसरपंचांची सदस्यांमधून निवड करेपर्यंत महसूल खाते कार्यरत असते व त्यानंतर मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांच्या ताब्यात ग्रामपंचायत दिली जाते. त्यानंतर महसूल खात्याची जबाबदारी संपुष्टात येऊन ग्रामपंचायत ग्रामीण विकास यंत्रणेकडे सोपविण्यात येते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाची माहिती संकलित करण्याची जबाबदारी कोणाची हा आजवरचा कळीचा मुद्दा ठरला असून, राज्यात अनेक ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही त्यांच्या निवडणुका मुदतीत होऊ शकलेल्या नाहीत, परिणामी कायदेशीर उल्लंघन झाल्याने त्यात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करावी लागली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाची अद्ययावत नोंद ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची व पर्यायाने ग्रामीण विकास यंत्रणेची असताना निवडणुकीशी संबंधित विषय असल्यामुळे महसूल खात्याचा बळी दिला जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.निवडणूक मुदतीत घेणे शक्यग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा गोंधळ टाळण्यासाठी आता सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून, त्यात ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व माहिती त्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीची नोंद सॉफ्टवेअरमध्ये घेतली जाणार असून, पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्याची माहिती संबंधित विभागाला पोहोचविली जाईल, जेणेकरून ग्रामपंचायतीची निवडणूक मुदतीत घेणे शक्य होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक