शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तहेर नेमण्यावरून पाटील  यांच्यावर प्रश्नांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:10 IST

नाशिक : राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार व गैरकारभारावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक भेटीत दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी महसूल मंत्र्यांवर या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियातून टीका होत आहे.मागील ...

नाशिक : राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार व गैरकारभारावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक भेटीत दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी महसूल मंत्र्यांवर या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियातून टीका होत आहे.मागील आठवड्यात झालेल्या महसूल खात्याच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना महसूल मंत्री पाटील यांनी खात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त केली. हे चित्र बदलण्यासाठी आता या खात्यातील अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठीस्वतंत्र खासगी एजन्सी नेमण्यात आली असून या एजन्सीच्या माध्यमातून थेट पोलीस खात्यालाच ब्रिफिंग करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भात पोस्ट फिरत आहेत. महसूल विभागच काय तर प्रत्येक शासकीय कार्यालयात नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते ‘अनुलोम’ या संस्थेच्या माध्यमातून अगोदरच नेमण्यात आले आहेत, हे आपणास माहीत नाही काय? महसूल विभागातील शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम महसूल विभागाच्या कामकाजावर होत आहे. याची माहिती मंत्रालयात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी आपणास दिली नाही काय? असे सवाल महसूल मंत्री पाटील यांना विचारण्यात आले आहेत.राज्यातील ठराविक अधिकाºयांनाच चांगल्या व मोक्याच्या पोस्टिंग का मिळतात त्याचीसुद्धा माहिती आपण गुप्तहेर नेमून घ्यावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असा टोलाही लगावण्यात आला आहे. महसूल विभागात सध्या उपजिल्हाधिकारी संवर्गाची जवळपास १२५ पदे रिक्त असून, गेल्या पाच वर्षांपासून तहसीलदार या पदावर पदोन्नत्या होऊ शकल्या नाहीत. राज्यातील शेकडो पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी काहीही कारण नसताना नदी व वाळू पट्ट्यात नेमके काय करतात त्याचीही माहिती आपण या गुप्तहेर लोकांकडून घेणार आहात काय? असा सवाल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय