लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन यंत्रामध्ये रेडीएशनची समस्या निर्माण झाली असून सद्यस्थितीत केवळ डोक्याचे सीटीस्कॅन केले जात असून पोटाच्या सीटीस्कॅनसाठी रुग्णांना संदर्भ रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांनी दिली़ दरम्यान या बाबत आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार करण्यात आली असून येत्या दोन-तीन दिवसात कंपनीचे इंजिनिअर येऊन दुरुस्त करणार असल्याचे माहिती आहे़जिल्हा रुग्णालयात सुमारे सहा वर्षानंतर तीन कोटी रुपये खर्च करून सीटीस्कॅन मशिन बसविण्यात आले़ मात्र, या मशिनमध्ये शनिवारपासून (दि़.६) हायर रेडीएशनची समस्या निर्माण झाली असून त्यामुळे तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या प्रयत्नाने पुन्हा सुरू करण्यात आलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा शनिवारी (दि. ६) पुन्हा बंद पडली. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयात सुमारे कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या अत्याधुनिक मल्टी सिटीस्कॅन यंत्रणेचा वापरदेखील मोठ्या प्रमाणावर नव्हता. अचानक त्यात बिघाड झाल्याने तसेच गरीब गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणा?्या अशी महत्त्वपूर्ण यंत्रणाच बंद पडल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
रुग्णांचे हाल: जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅनला प्रॉब्लेम !
By admin | Updated: May 9, 2017 22:16 IST