शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किडनी विकाराचे वाढले रुग्ण

By admin | Updated: March 9, 2017 01:52 IST

जनसामान्यांमध्ये किडनी आजाराविषयी जनजागृती व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत चालणारा किडनी विकार नियंत्रणात यावा यासाठी ‘जागतिक किडनी दिन’ सर्वत्र साजरा केला जात आहे.

 स्वप्निल जोशी नाशिकजनसामान्यांमध्ये किडनी आजाराविषयी जनजागृती व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत चालणारा किडनी विकार नियंत्रणात यावा यासाठी ‘जागतिक किडनी दिन’ सर्वत्र साजरा केला जात आहे. ‘निरोगी जीवनशैलीसाठी किडनी निरोगी असायला हवी’ हे यावर्षीच्या किडनी दिनाचे घोषवाक्य आहे.वाढत चाललेला स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, व्यसनाधिनता यामुळे किडनी विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब याबरोबरच वेदनाशामक औषधांच्या गैरवापरामुळेदेखील किडनी विकाराचा आलेख वाढतो आहे. ‘क्रोनिक किडनी डिसीज’ हा दीर्घकाळ राहणारा आणि वाढत जाणारा आजार असल्याने वेळेवर आणि लवकर उपचार केल्यास किडनी विकार आटोक्यात राहू शकतो. किडनीची कार्यक्षमता गरजेपेक्षा जास्त असल्याने सुरुवातीला लक्षणे लक्षात येत नाहीत आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमता मंदावल्यावर हा आजार लक्षात येतो. यामध्ये किडनी विकार अखेरच्या टप्प्यावर असल्याने रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. क्रोनिक किडनी फेल्युअर आजारात लक्षणे आणि त्यांचे प्रमाण प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळे असते. यामध्ये प्रामुख्याने सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येणे, पाय सुजणे, थकवा येणे अशक्तपणा येणे ही लक्षणे सुरुवातीला दिसतात. तसेच किडनीचा आजार बळावल्यानंतर अंगाला खाज येणे, शरीरातील हिमोग्लोबिन कमी होणे, झोप न येणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे, झोपल्यावर दम लागणे आदि लक्षणे असू शकतात. या लक्षणांवरून किडनी निकामी असल्याची शंका आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाणे हिताचे ठरेल तसेच चाळिशी नंतर वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. नाशिक शहरात गेल्या पाच वर्षांत वीस टक्के नागरिकांना डायबेटिसमुळे किडनी निकामी झाल्याचे समोर आले आहे.