शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

‘त्याची’ पाहूनी रुग्णसेवा, वाटे कोणालाही हेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : मनुष्य संवेदनशील असला तरच त्याला समाजातील वेदना समजतात. केवळ वेदना समजणे उपयोगाचे नसून त्यासाठी आत्मीय कळवळा व ...

नाशिक : मनुष्य संवेदनशील असला तरच त्याला समाजातील वेदना समजतात. केवळ वेदना समजणे उपयोगाचे नसून त्यासाठी आत्मीय कळवळा व सामाजिक भानदेखील तितकेच महत्त्वाचे असते. याच जातकुळीतल्या मालेगावातील एका मुस्लीम युवकाने जातिभेदाच्या पलिकडे जाऊन वीस वर्षांपासून समाजकार्यात आपला ठसा उमटविला आहे, त्याचे नाव आहे...शफिक अहमद मोहम्मद रफिक शेख.

‘परजीवास्तव जेथ आंतडे कळवळुनी येई, त्या हृदयाविण स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही’ या बालकवींच्या ओळींची प्रचिती मालेगावमध्ये आली. वर्ष होते, २००५ चे. पती-पत्नी व दोन मुले लग्नसोहळा आटोपून दुचाकीने परत येत होते. पदर दुचाकीत अडकल्याने रस्त्यावर पडलेली महिला व दोन मुले पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेले. अंगावर शहारे आणणारे ते दृश्य पाहून गलबलून गेलेल्या शफिक शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता ते मृतदेह लिंबाच्या पानांनी झाकले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांनी आपण आजपासून भेदभावाच्या शृंखला तोडून लोकांच्या सुखदु:खात सहभागी व्हायचे, असा निश्चय केला. ती दुर्दैवी घटनाच त्यांना सामाजिक कार्यात वाहून घेण्यासाठी निमित्तमात्र ठरली. त्याचदरम्यान शेख रेल्वेने मुंबईकडे जात असताना त्यांनी दोन इसमांना बसण्यासाठी जागा दिली. रेल्वे इगतपुरीत थांबल्यानंतर लोकांनी त्या दोन जणांचा सत्कार केला. सत्काराचे कारण विचारल्यावर आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन अभियानच्या माध्यमातून सामाजिक काम करतो, असे सय्यद साबीर आणि संजीवकुमार यांनी सांगितले. शफिक यांना त्यांचा हेवा वाटल्याने अशाच प्रकारचे काम करण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यांनी शफिक यांना नांदेडला बोलावून अभियानाचा सदस्य बनवून घेतले. शफिक यांना या पदामुळे बळ मिळाले. सुरुवातीपासून त्यांना करप्शनविषयी प्रचंड राग होता. कोणी लाच मागितली असे जर त्यांच्याजवळ कोणी सांगितले तर लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोशी ते संपर्क साधायचे. १६ ते १७ लाचखोरांना त्यांनी सापळे लावून पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. करप्शनविरोधातील हे काम पाहून लोकांनी त्यांना शफिक शेखचा ‘शफिक ॲण्टिकरप्शन’ कधी बनवून टाकले हे त्यांनाही कळले नाही. तेव्हापासून संपूर्ण मालेगाव त्यांना याच नावाने ओळखू लागले. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीच्या समस्या, गरजूंना रेशनकार्ड काढून देणे, शंभर अपंग लोकांना लाेकवर्गणीतून सायकलींचे वाटप व आठ हजार लोकांना सरकारी शुल्कात वाहन परवाना काढून देण्याचे कामही सुरूच होते. शफिकचा उत्साह आणि योगदान पाहून अभियानाची जिल्हास्तरीय व नंतर महाराष्ट्र उपाध्यक्षपदापर्यंत बढती झाली. या सामाजिक कार्याची पावती म्हणून लोकांनी त्यांच्या पत्नीला महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून दिले. कालांतराने टिपू सुलतान यांचे वंशज साहेबजादा मन्सूर अली यांच्याशी भेट झाली. शफिकच्या सामाजिक कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचलेली होती. त्यांनी त्यांच्या ‘तहरीक के खुदादाद’ या संघटनेत काम करण्याची विचारणा करून प्रदेशाध्यक्ष बनविले. दोन संघटनांवर काम करीत असताना कामाला वेग आलेला होता. २००९ मध्ये सामान्य रुग्णालय सुरू झाले. मृतदेहांना आणण्यात अडचणी येत असल्याने लोकवर्गणी जमा करून रुग्णवाहिकेची खरेदी केली. ती रुग्णालयात उभी करून शहरातील सर्व पोलीस स्टेशनला संपर्क क्रमांक देऊन मृतदेहांची मोफत आणण्याची सेवा सुरू केली. आतापर्यंत शफिक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून आत्महत्या, जळीत, पाण्यात बुडालेले पाच हजार मृतदेह आणण्याचे काम केले आहे. इतकेच नव्हे; तर मृतदेहांना लागणारे प्लास्टिक व कापडसुद्धा ते माेफत पुरवित आहेत.

इन्फो...

कुटुंबीयांनी पाठ फिरविलेल्या नऊ जणांवर केले अंत्यसंस्कार

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगावमधील जो पहिला बळी गेला, त्याचा मृतदेह शफिकनेच उचलला होता. लोकांमध्ये आजाराविषयी प्रचंड प्रमाणात भीती होती, अशावेळी रुग्णांना घरून रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम तसेच अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी शहरातील दोन हजार रुग्णांना रुग्णालयात पोहोच केले. मृतांची संख्या वाढल्यावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयसुद्धा पुढे येत नव्हते. अशा ९ जणांवर तसेच अन्य २७ ते २८ मृतांवर अंत्यसंस्कार करून शफिक शेख यांनी सामाजिक भान जपले होते.

110921\11nsk_44_11092021_13.jpg

शफिक शेख