शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पथसंचलनातून शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:14 IST

नाशिक : तेरा अश्वपथक, १०० विद्यार्थ्यांचे ढोल पथक यांसह भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ शिस्तबद्ध संचलन करून कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तेरा अश्वपथक, १०० विद्यार्थ्यांचे ढोल पथक यांसह भोसला मिलिटरी स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ शिस्तबद्ध संचलन आणि शोक शस्त्र करून कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना दिली. गंगापूररोड येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणातील ‘अमर जवान’ ज्योतीजवळ संचलनाची सांगता करण्यात आली.कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलचे ७०० विद्यार्थी, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या ३०० विद्यार्थिनी आणि भोसला मिलिटरी महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागांतून पथसंचलन करून देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती केली. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या संचलनाची सांगता भोसला मिलिटरी स्कूलमधील अमर जवान ज्योतीजवळ शहिदांना मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एनसीसी विंगचे कमांडर कर्नल व्ही. पी. चित्ते यांनी दहशतवाद, घुसखोरी आणि पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पेटून उठलेल्या भारतीय लष्कराने कारगिल युद्धात विजय मिळविला. त्याचे स्मरण आपल्याला राहावे यासाठी ‘कारगिल विजय दिन’ साजरा केला जात असल्याची माहिती दिली तसेच भारतीय सैन्याच्या शौर्याची विविध उदाहरणे सांगितली. यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष रहाळकर, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष अतुल पाटणकर यांच्यासह मंगला सवदीकर, नरेंद्र वाणी, स्मृती ठाकूर, शीतल देशपांडे, कमांडंट निवृत्त मेजर चंद्रसेन कुलथे, कमांडंट स्क्वार्डन सुप्रिया चित्रे, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या मुख्याध्यापक डॉ. अंजली सक्सेना, भोसला मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापक चेतना गौर, भोसला प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर आदी उपस्थित होते. एनसीसी विद्यार्थी सहभागी होते.शहरातील विविध भागांतून पथसंचलनकॉलेजरोड येथील प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक, गंगापूररोड येथील शहीद चौक आणि पारिजातनगर बस स्थानक चौक याठिकाणीदेखील कारगिल चौकात शहीद झालेल्या सैनिकांना शोकशस्त्र करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीदेखील सहभागी होत शहीद जवानांना मानवंदना दिली.