शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

करारनामा न करताच पेस्ट कंट्रोलचे कार्यादेश

By admin | Updated: August 21, 2016 01:32 IST

ठेकेदाराकडून काम सुरू : १९ कोटींचा ठेका पुन्हा वादात

नाशिक : महापालिकेत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून अजूनही कवित्व सुरूच असून, आरोग्याधिकाऱ्यांनी करारनामा न करताच संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्याचे उघड झाले आहे. सदर ठेकेदाराने गेल्या ८ आॅगस्टपासून काम सुरूही केले आहे. दरम्यान, मनसेचे स्थायी समिती सदस्य यशवंत निकुळे यांनी गेल्या सभेत सदर ठेकेदाराला मालेगाव महापालिकेने काळ्या यादीत टाकले असल्याचा आदेश सादर करूनही प्रशासनाकडून त्याबाबत काहीही कार्यवाही न झाल्याने सदरचा ठेका पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत पेस्ट कंट्रोलसाठी तीन वर्षांकरिता निविदाप्रक्रिया राबविली होती. १९ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत स्थायी समितीने सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला होता व नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. परंतु गेडाम यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असता शासनाने तो निलंबित केला. स्थायी समितीने सदर निलंबनाच्या निर्णयाविरोधी आपले अभिवेदन दिले असता शासनाने दि. १९ मे २०१६ रोजी स्थायीचा ठराव विखंडित करून संबंधित निविदाधारक मे. दिग्वीजय एंटरप्राईजेस यांना कार्यादेश देण्यासाठी आयुक्तांना अधिकार बहाल केले होते. त्यानुसार गेडाम यांनी शासन निर्णय व कायदेशीर अभिप्रायानंतर दि. २३ जून २०१६ रोजी मे. दिग्वीजय एंटरप्राईजेस यांना कार्यादेश व करारनामा करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना काढले. त्यानंतर ७ जुलै रोजी गेडाम यांची बदली झाली, तर २३ जूनचा सदर आदेश आरोग्य विभागाला ६ आॅगस्टला प्राप्त झाल्याचे सांगितले गेले. त्यानुसार, दि. ८ आॅगस्टपासून संबंधित ठेकेदाराला आरोग्य विभागाने काम करण्याचे आदेश काढले, परंतु त्याबाबतचा करारनामा अद्यापही केला नसून ४९ लाखांची बँक गॅरंटीही अद्याप घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. करारनामा न करताच ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आल्याने आणि संबंधित ठेकेदाराला मालेगाव महापालिकेने काळ्या यादीत टाकूनही नाशिक महापालिका प्रशासनाने काहीही दखल न घेतल्याने सदरचा ठेका पुन्हा वादात अडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)