शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या उजव्या कालव्यावरून प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:01 IST

गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वेगवेगळे प्रारूप विचाराधीन आहेत.

नाशिक : गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वेगवेगळे प्रारूप विचाराधीन आहेत. नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबवल्यानंतर महापालिका हद्दीतील हा कालवा बंद झाला. आता या कालव्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. असे असले तरी शहरातील या कालव्याची बहुतांशी जागा ही मोकळी आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटवून कालव्याच्या जागेचा सुयोग्य वापर केल्यास त्यावरून किमान प्रवासी वाहतूक होऊ शकते. यासंदर्भात, नाशिक सिटीझन फोरमने मध्यंतरी महापालिकेला निवेदनही दिले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, त्यांनीदेखील तशी तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवरील या कालव्याच्या लांबी आणि रुंदीचे मोजमाप सुरू असून, अतिक्रमणे कोठे कोठे आहेत, त्यातील पक्की आणि कच्ची बांधकामे किती याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सदरचे काम झाल्यानंतर अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम हाती घेणार असून, त्यानंतर या जागेवर प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. आयुक्त मुंढे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमातदेखील प्रवासी वाहतुकीची तयारी दर्शविली आहे.गंगापूर धरण ते एकलहरा दरम्यान असलेल्या या कालव्याची महापालिका हद्दीत किमान वीस किलोमीटर लांबी आहे. याठिकाणी बीएआरटीएस म्हणजेच केवळ बससेवेसाठीच स्वतंत्र मार्गिका तयार करून बससेवेबरोबरच सायकल ट्रॅक तयार करण्याचा महापालिकेचा विचार आहे. तथापि, ट्रामसारखे अन्य पर्यायदेखील पडताळून पाहण्याची सूचना नाशिक सिटिझन फोरमनेकेली आहे.ट्राम सेवेचा विचार व्हावायुरोपात आणि कोलकात्यात आजही पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ट्रामविषयी आकर्षण आहे. शिवाय ही सेवा किफायतशीर असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने विचार केला पाहिजे, अशी सूचना करण्यात आली आहे. आयुक्तांनी या कालव्याच्या पडीक जागेचा सदुपयोग करण्यासाठी उचलेले पाऊल हे नाशिककरांना फायदेशीर ठरणार आहे. - सुनील भायभंग, अध्यक्ष, नाशिक सिटिझन फोरम

टॅग्स :godavariगोदावरी